वाशिम:- दिनांक 09/02/2023 रोजी ग्रामीण रुग्णालय मंगरुळपिर यथे जागरूक पालक व सुदृढ बालक मोहिमेची सुरुवात करनाच्या उद्देशाने भव्य मोफत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

.या कार्यक्रमा च्या उद्घाटनासाठी जिल्ह्यात घनिष्ठ मिञ म्हणून नावलौकीक असलेले दादा हयात कलंदर दर्गाचे शमशौद्दीन जहागीरदार व बिरबलनाथ महाराज संस्थेचे अध्यक्ष रामकुमार रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या शिबिरामुळे हिंदु मुस्लिम ऐक्याचाही अप्रतिम संदेश जनमाणसात पसरला आहे. या भव्य रक्तदाना निमित्त 40 लोकांनी रक्तदान केले.यामध्ये मंगरुळपिर चे सहायक पोलीस निरीक्षक मंजुषा मोरे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद भगत व वैद्किय अधीक्षक डॉ. श्रीकांत जाधव यानी स्वतः रक्तदान करून मोहिमेची सुरुवात केली.

तसेच ग्रामीण रुग्णालय चे 20 कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून समाजाचे ऋण फेडले. तसेच या मोफत आरोग्य तपासणी मध्ये 220 रुग्णांनी लाभ घेतले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व अधिकारी व कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते व बचत गटाच्या महीलेनी सहकार्य केले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *