वाशिम:- चारचाकी वाहनामधून गोमांस व गायीच्या हाडांची वाहतूक करत असल्याच्या संशयावरून जमावाने एका नादुरुस्त चारचाकी वाहनास आग लावून वाहन जाळले व चालकास मारहाण केली. अशा फिर्यादी नामे सतीश नरेंद्र सदांशीव यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन मानोरा येथे गुन्हा नोंदाविण्यात आला असून CCTV फुटेज व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या मदतीने ८ आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.
दि.०९.०२.२०२३ रोजी फिर्यादी हा वाहन क्र.MH30L2322 या वाहनाने हाडांचा माल विकत घेऊन दिग्रस येथून अकोला येथे जात असतांना मानोरा शहरातील दिग्रस चौकामध्ये बंद पडल्याने सदरची गाडी हि दिग्रस चौकात उभी असतांना गाडीतील हाडांना पाहून तेथे जमाव जमा झाला. जमावातील काही लोकांनी फिर्यादीस शिवीगाळ करून मारहाण केली व गाडीला आग लावली.घटनेची माहिती मिळताच पो.स्टे.मानोरा येथील पोलीस अधिकारी व अंमलदार घटनास्थळी हजर झाले व अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. घटनास्थळावरील CCTV फुटेज व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या मदतीने ८ आरोपींना अटक करण्यात आली असून यातील ६ आरोपींवर यापूर्वीदेखील गुन्हे दाखल आहेत. गाडीतील हाडांचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत. अवैधपणे जनावरांची हाडे वाहतूक केल्याप्रकरणी सदर वाहनचालक व वाहन मालकाविरुद्ध पो.स्टे.मानोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरु आहे.
वाशिम पोलीस दलातर्फे गोवंश हत्या व वाहतूक प्रतिबंधासाठी वारंवार कारवाया करण्यात येत असून मागील वर्षी एकूण १३ केसेसमध्ये १९ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली असून कोणत्याही संघटना, संस्था किंवा व्यक्तींना गोवंश बाबतचा कसलाही गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्यांनी कायदा हातात घेऊन बेकायदेशीर कृती न करता सदर बाब पोलीसांच्या निदर्शनास आणून द्यावी असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *