(फुलचंद भगत)
वाशिम:-शासनाने दिव्यांगाच्या प्रमाणपत्रात बोगस बाजीस आळा बसावा म्हणून यु.डी.आय.डी. दिव्यांग
ऑनलाईन प्रमाणपत्र सुरू केले आहे. परंतू यवतमाळ जिल्हयातील रहिवाशी सोनल प्रकाश गावंडे हया
पांढरकवडा नगर परिषद मधील शाळेमध्ये शिक्षीका म्हणून कार्यरत आहे. ती दिव्यांग नसतांनी सुध्दा
अपंग अनुशेष भरतीमधून २००९ मध्ये तिने नियुक्ती मिळविली असून तिच्या अपंगत्वाची ३५ वर्षे,फेरपडताळणी करण्यात यावी. म्हणून फिर्यादी नामे मयुर सदानंद मेश्राम, वय
व्यवसाय-उपसरपंच रा.हिवरा (बु), ता.नांदगाव खंडे, जि. अमरावती यांनी शिक्षण विभागाला तक्रार केली होती. त्या अनुषंगाने संबंधित विभागाने आदेश दिले होते. सोनल प्रकाश गावंडे यांनी वाशिम जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये दि. ०२/०९/२०२२ रोजी दिव्यांग यु.डी.आय.डी. ऑनलाईन अर्ज दाखल केला. त्या अर्जासोबत तिने ऑफलाईनचे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र, बोगस आधारकार्डच्या आधारे वाशिम जिल्हयातील रहिवाशी दाखवून त्या आधारे ऑनलाईनचे बोगस यु.डी.आय.डी. प्रमाणपत्र
संबंधीत विभागाला सादर केले. त्या सर्व प्रमाणपत्राची रूग्णालयामार्फत पडताळणी केली असता सर्व
कागदपत्र हे बोगस असल्याचे आढळून आले व तसे जिल्हा रूग्णालयाने लेखी पत्राद्वारे कळविले.
पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे सदर बोगस दिव्यांग शिक्षीका सोनल प्रकाश गावंडे हिचे विरूध्द लेखी तक्रार दिली आहे. यामध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र बनविणाऱ्या टोळीमधील मुख्य सुत्रधार सोनल प्रकाश गावंडे ही आहे व नगर परिषदमधील शिक्षण विभागातील अतुल वानखडे व राजश्री शाहू महाराज प्राथमिक शाळा, पांढरकवडा येथील शिक्षक नहुष ज्ञानेश्वर दरवेशवार हे सुध्दा सहभागी
आहेत,” अशा फिर्यादीचे तक्रारीवरून आरोपी नामे १) सोनल प्रकाश गावंडे, रा. मंगलमुर्ती नगर,वडगाव, यवतमाळ २) अतुल वानखडे, रा. तपानवाडी, यवतमाळ ३) नहुष ज्ञानेश्वर दरवेशवार, रा.लेआऊट वडगाव, यवतमाळ यांचे विरूध्द सदरचा गुन्हा
४२०,४६७,४६८,४७१,३४ भादंवि प्रमाणे दाखल केला असून तपास परिविक्षाधिन पोलीस ऊपनिरीक्षक सचिन गोखले हे करीत आहेत.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206