section and everything up until
* * @package Newsup */?> औरंगाबाद : सावळदबारा येथील हरिहर मंदिर संस्थान येथे अनेक मूर्तीप्राणप्रतिष्ठा | Ntv News Marathi

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे हरिहर मंदिरामधे महादेव पिंड ,नंदी, विठ्ठल रखुमाई , श्रीराम,लक्ष्मण, सिता आणि बजरंग बली यांच्या मूर्ती चे मंदिराचे आकर्षण ठरले आकर्षक मूर्ती यांच्या स्थापनेमुळे आज गावात व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यानिमित्ताने महाप्रसाद आयोजन केले होते यावेळेस गावातील 11 जोडपे पूजेसाठी बसून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली

यासाठी गावातील सर्व गावकरी मंडळी व वारकरी संप्रदायाचे भक्त यांनी 3 दिवस मेहनत घेतली यावेळेस या पूजेची प्रतिष्ठा संजय स्वामी महाराज, अमोल महाराज,सचिन महाराज मुळे, यश स्वामी महाराज यांनी विधिवत पूजन करून मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली यावेळेस गावातील अनेक दानशूर यांनी मंदीर व कलश आणि मूर्ती साठी देणगी देऊन हा अविस्मरणीय सोहळा आज मोठया थाटात पार पडला या वेळेस महिला ,पुरुष भक्त सहभाग व, तरुण मित्र मंडळ यांचा जास्त सहभाग दिसून आला

आयोजक, वासुदेव खडके, आबाराव कोलते,बेलापा करदळे, प्रमोद काळे, गणेश खैरे , योगेश खैरे , संदीप कोलते, रमेश महाराज खराटे,देवाप्पा पंधांडे,आनंदाअप्पा चोपडे,रमेश देशमुख,भागवत महाजन,विशाल खडके,सोपान मानकर,सुनील राजपूत,विजय सुरपाटने, भगवान टिकारे,गुलाबराव राजपूत,संजय आप्पा काळे,पंढरी सपाटे, पांडू बोबडे,राजू बावस्कर, राजूआप्पा कुल्ली,डॉ रामबली पांडे,भास्कर पाटील,जगन वरखड,आकाश कळसकर,अक्षय जमाले व इतर वारकरी व गावकरी यांची उपस्थिती होती

प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *