औरंगाबाद : राष्ट्रीय महामार्ग एन.एच.11 सोलापूर- धुळे महामार्गचे काम प्रगतीपथावर असुन या ठिकाणी जवळपास ७०० कामगार कर्मचारी रात्र-दिवस काम करून लवकरात लवकर रस्ता उभारणीचे काम करत असुन त्यांना कोरोना लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्र येथे जाऊन रांगेत टोकन घेणे शक्य होत नसल्याने ही बाब लक्षात घेऊन त्यांना रोडवर काम करत असताना कोरोनाचा धोका पत्करून काम करतात यामुळे या बाबतीत नागेश कुठारे उपसरपंच तिसगाव तथा शिवसेना विभागप्रमुख यांनी वैद्यकीय अधिकारी डाॅ. संग्राम बामणे यांना दि.१०.७.२१ रोजी लेखी निवेदन देऊन लसीकरण त्यांच्या वळदगाव येथिल कॅम्प च्या परिसरात लसीकरण करावे ही विनंती करून मागणी केली या मागणीला आरोग्य आधिकारी यांनी मंजुर करून आज प्रत्यक्ष वळदगाव येथिल कॅम्प येथे लसीकरण सुरूवात करण्यात आली. या प्रसंगी डाॅ.संग्राम बामणे ,उपसरपंच तथा शिवसेना विभागप्रमुख नागेश कुठारे,काकासाहेब बुट्टे,मिनल कोंबळे,नरेंद्र यादव ,सुदाम जाधव यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली या प्रसंगी दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्र चे अयोग्य सेविका प्रियंका घोडेस्वार, आनंद वाघ अयोग्य सेवक, आशा सानप ज्योती लसीकरण करून घेतले तर या प्रसंगी एल अॅड टी कन्स्ट्रक्शन्स चे प्रोजेक्ट मॅनेजर सुर्या राव , संजय प्रधान,युगल गुप्ता सेक्शन ईन्चार्ज आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज , वाळुज औरंगाबाद.
मो.8484818400