महावितरणने ३७ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. तो मान्य झाल्यास सर्वच ग्राहकांना २.५० रुपये प्रतियुनिट असा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. याला विरोध करत मसिआ, टीम ऑफ असोसिएशन, ऊर्जा मंचच्या वतीने वीज दरवाढ प्रस्तावाची होळी करून निषेध करण्यात आला.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मार्च 2020 रोजी मार्च 2025 अखेरपर्यंतच्या पाच वर्षांसाठी बहुवर्षीय वीजदरनिश्चिती आदेश जाहीर केला आहे. तसेच वीज कायद्यातील तरतुदीनुसार तिसऱ्या वर्षी वीज पंपन्यांना वाढीव खर्चासाठी फेरआढावा याचिका दाखल करता येते. त्यानुसार महावितरणने 2023-24 साठी 8.90 रुपये प्रतियुनिट तर 2024-25 साठी 9.92 रुपये प्रतियुनिट दरवाढीची मागणी केली आहे. चालू वीज दराची विचार करता सदरची वाढ 14 टक्के आणि 11 टक्के एवढी असल्याचे दिसत आहे. ही ग्राहकांच्या डोळ्यात धूळफेक करणारी आकडेवारी असून इंधन समायोजन आकारासह अन्या बाबींचा विचार करता प्रतियुनिटच्या वीज दरात 2.55 रुपयांपर्यंत वाढ होणार असल्याचा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केला आहे. वीज दरवाढ करताना कोणत्याही परिस्थितीत 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करू नये असे निर्देश विद्युत अपिलीय प्राधिकरणाचे आहेत, मात्र त्याला महावितरणने हरताळ फासत मोठ्या वीज दरवाढीची मागणी केली आहे.
यावेळी किरण जगताप- अध्यक्ष MASSIA, हेमंत कपाडिया-अध्यक्ष, ऊर्जा मंच व रविंद्र वैद्य-अध्यक्ष लघु उद्योग भारती, मिलिंद थोरात- अध्यक्ष BIMATA व उद्योजक उपस्थित होते.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद.
मो.8484818400