10 मार्च रोजी अंगावर डिझेल ओतून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पेटवून घेणार
सचिन बिद्री:उमरगा
तालुक्यातील गुरुवाडी नदीपात्रात बांधन्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत दोन वर्षांपासून आंदोलणे करन्यात आले पण न्याय भेटत नसल्याने अखेरचा पाऊल उचलत आंदोलक तथा सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल उर्फ पवन जेवळे हे येत्या 10 मार्च रोजी आत्मदहन करणार असल्याबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयाला निवेदणाद्वारे दी 27 फेब्रुवारी रोजी इशारा दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की,मौजे गुरुवाडी ता उमरगा येथील नदीपात्रात कोट्यावधी निधी खर्च करून तीन एफआरपी गेटची उभारणी करण्यात आलेली आहे, प्रत्यक्षात खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे. असा आरोप या निवेदनात करण्यात आला असून गेल्या तीन वर्षांपासून पुराव्यासह लोकशाही मार्गाने बेमुदत आमरण उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन केले असता संबंधित विभागाच्या अधिकार्यामार्फत धमक्या भेटल्या आणी न्यायदेवता उपविभागीय अधिकारी मार्फत केवळ आश्वासन.असे या निवेदनात म्हटले आहे.
पुढे नमूद करण्यात आले आहे की,सदरील नदीपात्रातील सिमेंट बंधारे हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे,नदीपात्रातील खोलीकरण केले नसल्याबाबत 13 जानेवारी 2022 व 24 जानेवारी 2023 रोजी उपोषणालाही बसलो होतो व याही उपोषणावेळीही माननीय उपविभागीय अधिकारी साहेब यांनी समिती गठीत करून सदरील झालेल्या निकृष्ट कामाची व तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी दिलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या लेटर पॅड वर केलेल्या बोगस सह्या या सर्व चौकशी करण्यासाठी आपण समिती गठीत करून चौकशी करण्याचे व दोषीवर एका महिन्यात कठोर कारवाई करणार असल्याचेही आश्वासन दिलेले होते. महिना उलटाला पण प्रशासन झोपेत आहे की काय असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे.साहजिकच, कारण दरम्यानच्या काळात गुंड प्रवृतीच्या अनोळखी लोकांनी रस्त्याने जाताना धमक्या देत आले. मी न डगमगता आपल्यावर माझा ठाम विश्वास असल्याने अजूनही लोकशाही मार्गाचा वापर करतोय.सदर प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे आपणास पुनःश्च एकदा नम्र विनंती आहे की आपण आश्वाशीत केल्या प्रमाणे सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कायमस्वरूपी तात्काळ निलंबनाचे कार्यवाही करावी अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.अन्यथा उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 10 मार्च 2023 रोजी अंगावर डिझेल ओतून पेटवून घेऊन आत्मदहन करणार असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.