उमरगा प्रतिनिधी : सत्तेत आलेल्या भाजपा सरकारच्या धोरणामुळे जनता त्रस्त झाली आहे. निवडणुका आल्या की धर्म व जातीयवादाची पेरणी करणार्‍या भाजपाला त्यांची जागा दाखविण्याची गरज आहे.पदवीधर, शिक्षक मतदारसंघ व कसबा पोटनिवडणुकीतील निकालामुळे भारतीय जनता पार्टीला राज्यात बुरे दिन सुरू झाल्याचे दिसत आहे.म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरदचंद्र पवार यांचे विचार कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवावेत.सामान्य जनतेच्या समस्या सोडवून पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख उमरगा येथील शरद युवा संवाद यात्रेतील कैलास शिंदे मंगल कार्यालयात झालेल्या सभेत गुरुवारी (दि ०२) रोजी केले.


राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रातील २७ महानगरे आणि ३२८ तालुक्यात शरद युवा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली गुरुवारी (दि ०२) सायंकाळी उमरगा येथे आली असता शहरातील हुतात्मा स्मारक ते कैलास शिंदे मंगल कार्यालयापर्यंत भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीची यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शेख बोलत होते. मेळाव्याला अध्यक्ष म्हणून धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा .सुरेश बिराजदार,मराठवाडा समन्वयक चंदन पाटील नगराळकर , जिल्हा निरीक्षक प्रशांत संयोजक प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे,प्रदेश सरचिटसनीस आदित्य गोरे,प्रदेश सरचिटनीस प्रशांत कवड़े,युवक जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी, प्रदेश कार्यकारणी सदस्य अरूण आजबे, प्रदेश कार्यकारणी सदस्य वलीखान पठाण,माजी नगराध्यक्ष औसा भरत सूर्यवांशी,प्रदेश कार्यकारणी सदस्य शांतनू खंदारे, प्रदेश कार्यकारणी सदस्य मजहर शेरीकर,बिदर जिल्हाध्यक्ष अजिंक्य मुळे ,जिल्हा सचिव नितिन बागल आदी उपस्थित होते.


पुढे बोलताना युवक प्रदेशाध्यक्ष श्री शेख म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात न्याय मिळतो. हे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून पक्षश्रेष्ठींनी सिद्ध केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खा.सुप्रियाताई सुळे, यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता आपण युवकांचे संघटन वाढविणार असल्याचेही ते म्हणाले. केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर त्यांनी कडाडून टिका केली. उपस्थित मान्यवरांचीही यावेळी भाषणे झाली.
यावेळी उमरगा तालुका अध्यक्ष संजय पवार,लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके,जिल्हा उपाध्यक्ष भिमा स्वामी, मोहन जाधव,शंतनू भैया सगर, बाबा पवार, शमशोद्दीन, सुशील दळगडे,फैयाज, जितेंद्र चौगुले,रणधीर इंगले,शेखर घोड़के ,गोविंदराव साळुकें,जगदीश सुरवसे, धीरज बेळंबकर ,अजित पाटील,रणजीत गायकवाड,विष्णु भगत,मोहन शिंदे,व्यंकट जाधव,खंडू काळे,श्रीराम जगदाले, पवन पाटील,बाबा कुरेशी,वाघंबर सरवदे,सचिन रणखंब,आनंद पाटील ,हाजी पठान ,आलताफ पटेल ,शरद पाटील आदी सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *