(सचिन बिद्री:धाराशिव)

दिनांक (2)रोजी उमरगा शहराचे नाव बदलून आनंदीपूर असे जुने नाव पुर्ववत करण्याची मागणी येथील नागरिकांनी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की “उमरगा शहर व उमरगा तालुका एकेकाळी मुघलांच्या ताब्यात होते. मुघल हे क्रूर व दुष्कर्मी वृत्तीचे होते, त्यांनी भारतीय लोकांवर त्यांच्या काळात खूप अन्याय अत्याचार केलेला आहे. त्यामुळे ते कुणाचेही आदर्श होऊ शकत नाहीत. त्यांनी अनेक शहरांची नावे बदलून क्रूर मुघलांचे नाव दिलेले आहेत. उमरगा शहराचे नाव हे आनंदीपूर असे होते
हे सर्वज्ञात आहे.जुने वयोवृद्ध लोक आजही आनंदपूर या नावाने ओळखतात. महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांची मुघल नावे बदलून छत्रपती संभाजीनगर व धाराशिव असे बदल केले आहे. त्याच धर्तीवर उमरगा शहर व तालुक्याचे नाव “आनंदीपूर” असे पुर्ववत करावे.”अशी मागणी निवेदणाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर काशिनाथ राठोड, किशोर माडजे, लक्ष्मण मिरकले, बालाजी मद्रे, स्वप्नील वनकुद्रे, संदीप सूर्यवंशी, पृथ्वीराज जाधव, बालाजी भोसले आदींच्या सह्या आहेत.

      उमरगा शहरामध्ये जवळपास साडेआठशे वर्षांपूर्वीचे हेमाडपंती असे त्रिदेव मंदिर आहे.यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचे हे मंदिर असून याच काळात कल्याणी चालुक्य यांची राजवट चालू होती. या कल्याणी राजवटीमध्ये उमरगा तालुक्यातील मुळज  येथील चालुक्य घराण्यातील ''आनंदीबाई'' या कल्याणी राजघराण्यात सून होत्या.ह्या उमरगा शहरातील येथील या हेमाडपंथी महादेव मंदिरात पूजा करण्यासाठी येत असत. यावेळेस येथे घनदाट जंगल होते.या मंदिर परिसरात त्यावेळेस जंगल साफ करून येथे वस्ती करण्यात आली. या वस्तीचे नाव "आनंदपुर" असे करण्यात आले होते.
    नंतर निजाम राजवटीमध्ये उमर नावाचे फकीर येथे राहात होते. ते लोकांना आजारावर काही आयुर्वेदिक औषधे देत असत. उर्दू भाषेमध्ये राहण्याच्या ठिकाणास  'गाह' असे म्हटले जाते.त्यामुळे ते जेथे राहत तो "उमरगाह" असे नाव पडले. कालांतराने याचे नाव उमरगा असेच झाले.
     साधारण शंभर वर्षांपूर्वी सदरील गावच्या रजिस्ट्री(जमिनीचे खरेदीखत)ह्या आनंदीपूर या नावाने होत होत्या.निजाम राजवटीनंतर मराठवाडा सन 1948 मध्ये  स्वतंत्र झाला. यावेळेस या भागाचे आमदार मुळज, तालुका उमरगा येथील भास्करराव चालुक्य हे चार टर्म आमदार होते.सुरुवातीला भास्करराव चालुक्य यांचे लहान बंधू विजयसिंह चालुक्य यांना भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उमेदवारी भेटली होती. चालुक्य घराण्यातील विजयसिंह शिवरामपंत चालुक्य यांना उमेदवारी भेटली अन् त्यात शेकाप पक्षाकडून विजयसिंह शिवरामपंत चालुक्य यांचा दनानून विजय झाला  आणि ते याच उमरगा तालुक्याचे आमदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर विजयसिंह चालुक्य यांचे मोठे बंधू भास्करराव चालूक्य यांनी चार टर्म आमदार म्हणून लोकसेवेत आपलं वर्चस्व गाजवले.ज्यांनी या शहराला वसवलं, शहराच अस्तित्व उदयास आणलं, ओळख निर्माण केली असे चालुक्य घराण्याचे वंशज आजही या तालुक्याचे प्रतिनिधीत्व करत असताना दिसून येतात. एकंदरीत पाहता धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उमरगा तालुक्याचा दबदबा आजही कायम असून जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा येथुनच याच तालुक्यातून विशेत: मुळज येथून ठरते.
  आनंदी बाई ह्या पण चालूक्य घराण्यातील होत्या .म्हणून उमरगाचे नाव आनंदीपूर करण्यात यावे,असे त्यावेळेस त्यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. परंतु ती मागणी काही अज्ञात कारणास्तव मान्य झालेली नव्हती. भास्करराव चालुक्यांनी उमरगा येथे आर्य समाज मंदिर बांधले होते. या आर्य समाज मंदिराला आर्य समाज मंदिर, आनंदीपूर असे नाव देण्यात आलेले होते.या सर्व कारणांमुळे  या भागातील लोकांनी उमरगाचे नाव पूर्वरत पुन्हा आनंदीपूर  करण्यात यावे ,अशी मागणी केलेली आहे.अशी माहिती तालुक्यातील जेष्ठ व्यक्तींकडून प्राप्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *