section and everything up until
* * @package Newsup */?> गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून भव्य ‘स्वयंरोजगार मेळावा’ संपन्न | Ntv News Marathi

गडचिरोली सतीश आकुलवार)


गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मा. पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन गरजु युवक-युवतींकरीता स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दि. 30/08/2021 रोजी कुक्कूटपालन व शिवणकाम प्रशिक्षण पुर्ण केलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींकरीता स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य धाम येथे करण्यात आले.

गडचिरोली पोलीस दल, बीओआय आरसेटी गडचिरोली, कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सोनापूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या स्वयंरोजगार मेळाव्यास कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत 55 व बीओआय आरसेटी अंतर्गत 35 असे एकुण 90 कुक्कुटपालन प्रशिक्षणार्थी तसेच बीओआय आरसेटी अंतर्गत शिवणकाम (टेलरींग) प्रशिक्षण पुर्ण केलेल्या 35 प्रशिक्षणार्थी, अशा एकुण 125 प्रशिक्षणार्थ्यांनी आपला सहभाग स्वयंरोजगार मेळाव्यात नोंदवला. यावेळी कुक्कुटपालन प्रशिक्षण पुर्ण केलेल्या 90 उमेदवारांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करण्यासाठी रोड आयस्लँड रोड (RIR) जातीचे प्रत्येकी 10 नग कुक्कुटपक्षी (चिक्स), 10 किलो खाद्य, भांडी व इतर साहीत्य वितरीत करण्यात आले व आरसेटी अंतर्गत शिवणकाम प्रशिक्षण पुर्ण केलेल्या 35 युवतींना शिलाई मशिन वितरीत करण्यात आले तसेच यशस्वीरीत्या प्रशिक्षण पुर्ण केलेल्या सर्व 125 उमेदवारांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले.

गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने सुरु असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यत गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना ब्युटी पार्लर 35, मत्स्य पालन 25, कुक्कुटपालन 125, शिवणकाम 35, मधुमक्षिकापालन 32 व शेळीपालन 67 अशा एकुण 319 बेरोजगार युवक युवतींना प्रशिक्षण देवुन स्वयंरोजगारासाठी आत्मनिर्भर केले आहे. तसेच हॉस्पीटॅलिटी, ऑटोमोबाईल प्रशिक्षण, सुरक्षा रक्षक व नर्सिंग असिस्टंट म्हणुन आज पर्यंत 1786 ग्रामीण गरीब व गरजु युवक-युवतींना प्रशिक्षण देवुन रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहे.

कुक्कुटपालन व शिवणकाम प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवारांचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांनी कौतुक केले असून, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करतांना मा. पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर असून, नेहमी तुमच्या पाठीशी राहील, आपले मित्र व आप्तस्वकीय यांना देखील स्वयंरोजगाराच्या बाबतीत अवगत करून त्यांनी देखील गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिलेल्या स्वयंरोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा व आत्मनिर्भर बनून स्वत:चे जीवनमान उंचवावे. असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.

यावेळी मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. मनीष कलवानिया सा. अहेरी, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. सोमय मुंडे सा., मा. पोलीस उपअधीक्षक (अभियान) श्री भाऊसाहेब ढोले सा. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली तथा प्रकल्प संचालक, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) गडचिरोली मा. श्री संदीप कराळे, मा.श्री पुष्पक बोथिकर विषय विशेषज्ञ (किटकशास्त्र), मा. श्री ज्ञानेश्वर ताथोड विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी), व बीओआय आरसेटीचे संचालक मा. श्री चेतन वैद्य, कार्यक्रम समन्वयक मा. श्री. हेमंत मेश्राम हे उपस्थित होते.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे/उपपोस्टे/पोमके तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. महादेव शेलार व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *