गडचिरोली : मारकंडा कं येथे बऱ्याच वर्षांपासून सुरळीत सेवा मिळत हाेती.कारण मारकंडा कं येथे विधूत कर्मचारी लाईनमॅन मुख्यालयी राहत होता आता लाईनमॅन मुख्यालयी राहत नसल्याने काही महिन्यांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित हाेत आहे. विशेष म्हणजे, हा परिसर जंगलव्याप्त आहे.
त्यामुळे वादळवारा सुटल्यानंतर वीजपुरवठा खंडित हाेताे. या परीसरात वन प्राण्यांची शिकार केली जाते त्यामूळे वीजपुरवठा खंडित होत असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे परंतू दिवसा सुद्धा विजपूरवठा वारंवार खंडित होत असते यावर वेळीच उपाययाेजना हाेत नसल्याने वीजपुरवठा खंडित हाेताे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर मारकंडा कं येथील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय कार्यालये येथील काम वारंवार विस्कळीत हाेत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.