लातूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीयोजने अंतर्गत शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी अहमदपूर पंचायत समितीतर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील शेतकऱ्यांना गोठे बांधणीसाठी या कार्यशाळेचा नक्कीच लाभ होईल. या ठिकाणी कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून दि.महाराष्ट्र पणन फेडरेशन लि.मुंबई चे चेअरमन तथा लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील उपस्थित होते..
यावेळी गटविकास अधिकारी महेश सूळ ,उदगीर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी जि. प सदस्य माधवराव जाधव, सभापती गंगासागर जाभाडे, अहमदपूरचे गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड, उपसभापती बालाजी गुट्टे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, पंचायत समिती सदस्य रमाकांत भातिकरे,जिल्हा उपाध्यक्ष गोपीनाथराव जोंधळे, युवक ता. अध्यक्ष दयानंद पाटील, फेरोज शेख, माणिक नरवटे ( पं. स.सदस्य ), नबी सय्यद, सावंत साहेब( जी.प.अभियंता बांधकाम) अशोक सोनकांबळे, भगवान ससाणे, तसेच ग्रामसेवक, कर्मचारी व अभियंता आदींची उपस्थिती होती. अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना गोठयांचा जास्तीत जास्त लाभ होणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
ब्युरो चीफ अफजल मोमीन एन टी व्हि न्युज मराठी लातूर