अपघाताचे प्रमाण वाढले!!प्रशासन जागे कधी होणार याकडे सर्वाचे लक्ष !!

लातुर : नांदेड-बिदर राज्य मार्गावरील रस्त्यावर एक-एक फुट खोलीचे खडे पडून रस्ता पुर्णपणे उखडलेला आहे.या रस्त्यावरुन वाहन चालवताना वाहन चालकास जिव घेणी कसरत करावी लागत आहे. एखादे वाहन धावले की वाहनाच्या पाठीमागे धुळीचे लोट निर्माण होत आहेत हाळी ते शिरुर ताजबंद रस्त्याची तर दैनाच उडाली आहे. यामध्ये ऊसाच्या अवजड वाहनांची भर पडली आहे.

अहमदपूर -शिरुर हाळी हंडरगुळी उदगीर मार्गे नांदेड- बिदर हा राज्यमार्ग जातो.या रस्त्यावर दुचाकी, चारचाकी,जीप, टमटम,बसेसह अवजड वाहनांची सतत ये-जा असते.मात्र राज्यमार्गाची दुरवस्था झाली आहे. अपघाताचे प्रमाण वाढले असुन या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व वाहन चालकांना मोठी भिती निर्माण झाली आहे. वाहन चालवताना गाडीचे मेंन्टनस जास्त निघत आहे व ऊस वाहतूक अवजड वाहनांची अवस्था वाईट झाली आहे दररोजच वाहन रस्त्यावर अडकलेले असते. हाळी ते शिरुर ताजबंद दरम्यान १० किमी अंतर आहे पण हे अतंर पार करण्यासाठी अर्धा तासांचा वेळ लागत आहे.तेव्हा या परीसरातील जनतेकडून रस्ता दुरुस्ती व नविन रस्ता बनवण्याची मागणी होत आहे.याकडे प्रशासन कधी लक्ष देणार व वाहन चालकांना व प्रवाशांना कधी दिलासा मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरले आहे.

लक्ष्मीकांत मोरे
एन.टिव्ही.न्युज मराठी
उदगीर, जळकोट प्रतिनिधी लातुर

         


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *