धाराशिव : जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील शेतकरी पुन्हा अडचणीच्या भोवऱ्यात सापडला असून अचानक एकाएकी दि 7 एप्रिल रोजी पहाटे 5 च्या सुमारास सुरु झालेल्या गारपीटसह अवकाळी पावसाने आपलं रुद्र अवतार दाखवला आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.अचानक गारपीट होऊन जवळपास सर्व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.यामुळे शासन प्रशासन तत्परतेने आर्थिक सहाय्य करतील याकडे सर्व शेतकऱ्यांचा लक्ष लागले असून मोठ्या अपेक्षा बाळगून आहेत.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी यांनी उमरगा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी घेत पाहणी केली.
या अवकाळी पावसात मुरूम शिवारातील प्रकाश कल्लाप्पा कंटेकुरे व विद्या खंडप्पा कंटेकुरे यांच्या गट नंबर १४५/१ मधील सहा एकर पपई या पिकाचे पूर्णतः नुकसान झाले असून या पिकाची सातलिंग स्वामी यांनी शनिवारी दुपारी भेट देऊन पाहणी केली व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला. शिवारात काढणीला आलेल्या टोमॅटो, मिरची, हरभरा, गहू व ज्वारी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून,नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून मदत मिळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावेळी सूचना केल्या. या पाहणी दौऱ्यात कल्लाप्पा कंटेकुरे, विलास कंटेकुरे, पृथ्वीराज मुळे, राम हांडगे, सूर्यकांत तडकले, शिवराज आलुरे आदि या भागातील शेतकरी उपस्थित होते.
सचिन बिद्री