75 यशस्वी शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्थे होणार सन्मान
धाराशिव : उमरगा (चौरस्ता) येथील ओम लॉन्स येथे शांतीदुत परिवारच्या वतीने दोन (२) एप्रील रविवार रोजी भव्य शेतकरी मेळावा व विविध आधुनिक शेती अवजारांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणुन धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी,आणि उपजिल्हाधिकारी तथा उमरगा उपविभागीय अधिकारी गणेश पवार उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणुन उमरगा पं स.गटविकास अधिकारी कुलदिप कांबळे , पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड व कृषी अधिकारी सागर बारवकर यांची उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलिस निरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव यांनी शनिवारी उमरगा पोलिस ठाण्याला सदिच्छा भेट देऊन पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांच्याशी या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्वाश्वत शेती तांत्राचे प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा केली असून या भव्य कार्यक्रमात शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या शेतजमिनी वर आधारातीत पिके व आपल्या भागांतील विविध शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजनांविषयी व शेतीपूरक व्यवसाय यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

यावेळी शांतीदुत परिवारचे प्रा. युसुफ मुल्ला, प्रा. जिवन जाधव, मधु चौधरी (पुणे), रफीक शेख उपस्थित होते.
या शेतकरी मेळाव्याचे आयोजन रविवारी दिवसभरात तीन सत्र राहणार असून शेतकऱ्यांना पुरेपूर अशी अधुनिक तंत्रज्ञान प्राप्त होणार आहे यामुळे बळीराजा अधिक सक्षम होण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे मत माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी सांगितले आहे. तरी उमरगा तालुका व परिसरातील जास्तीत शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या मेळाव्याला तालुक्यातील विविध महीला बचत गटांना आपल्या उत्पादीत वस्तुच्या प्रदर्शन व विक्रीसाठी मोफत स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. स्टोल साठी ईच्छुक बचत गटांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.याच कार्यक्रमात तीन होतकरू विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही केले जाणार आहे आणि 75 यशस्वी शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्थे सन्मानित करण्यात येणार आहे.

तालुक्यातील व परिसरातील शेतकरी बांधवांसाठी ठेवण्यात आलेल्या या प्रदर्शन व मार्गदर्शन शिबीराचा लाभ आवश्य घ्यावा असे आवाहन शांतिदूत परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.
सचिन बिद्री, धाराशिव