दिशाभूल / चुकीची माहिती प्रकरण भोवणार!
छ. संभाजीनगर – महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ता तथा हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांच्या पाठपुराव्यामुळे आज यश हाती आलेले आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच वेतन अधिक्षक प्राथमिक यांची चौकशी करून दोन दिवसात शिक्षण संचलनालय प्राथमिक कार्यालयास सादर करावे असे आदेश शिक्षण संचालक प्राथमिक मा. शरद गोसावी यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक मा. श्री.अनिलजी साबळे यांना दिनांक 16 मार्च रोजी पत्र दिले आहे.
सविस्तर वृत्त असे की वेतन अधिक्षक प्राथमिक आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी शिक्षण संचालक कार्यालय पुणे यांना चुकीची व दिशाभूल करणारी माहिती सादर केली याबाबत खुलासा व सविस्तर पुरावे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम सर यांनी पुणे येथे प्रत्यक्ष सादर केले होते त्याची दखल घेत शिक्षण संचालक प्राथमिक मा. श्री.शरदजी गोसावी यांनी पत्र काढून सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे व दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता लक्ष विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे आहे की काय कारवाई करतात की फक्त कानाडोळा करून गुलदस्त्यात टाकतात… या कडे सर्वांचेच लक्ष लागून आहे……
रविंद्र प्रकाश खरात