(उमरगा प्रतिनिधी)

उस्मानाबाद : गरुडझेप फाउंडेशनच्या ६वा वर्धापनदिन व छ. संभाजी महाराज स्मृतिदिन सावित्रीबाई फुले स्मृतिदिन आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार 2023 व राष्ट्रीय बेटी बचाव बेटी पढाव जन आंदोलन अभियान उमरगा शहरांत आयोजन करण्यात आले होते यावेळी मान्यवरांच्या हस्थे विविध पुरस्काराचे वितरण व तसेच रॅली मधील सहभागी शाळेचे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले.शहरातील मलंग विद्यालयात संपन्न या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.मीनाक्षी पाटील काळे, राष्ट्रीय महासचिव कर्नाटक’ प्रदेश अध्यक्षा मराठा समन्वय परिषद कॅम्पस बिदर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गणेश राख-प्रणेते राष्ट्रीय बेटी बचाव बेटी पढाव आंदोलन अभियान,डॉ. प्रमोद लोहार- राष्ट्रीय मार्गदर्शक बेटी बचाव बेटी पढाव जन आंदोलन अभियान,नरहरी उर्फ गणेश पांडुरंग गरुड-संस्थापक अध्यक्ष गरुडझेप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य,डॉ. दीपक पोकळे- एम.डी मेडिसिन उमरगा, अजित गोबारे-अध्यक्ष रोटरी क्लब उमरगा आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.


बेटी बचाव बेटी पढाव आंदोलन महारॅलीची सुरुवात शहरातील हुतात्मा स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढून शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. रॅलीची सांगता मलंग शाळेमध्ये करण्यात आली दरम्यान वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यामध्ये डॉ.लालासाहेब गायकवाड-वैद्यकीय कार्य पुणे,शेषेराव लवटे-ॲम्बुलन्स सेवा उमरगा,वैभव बालकुंदे-पत्रकार लातूर,प्रा. सविता दूधभाते-शैक्षणिक कार्य पंढरपूर,उमाकांत मिटकर-सामाजिक कार्य नळदुर्ग,गोविंद इंगळे-पत्रकार लातूर आदींचा सन्मान करण्यात आला.बेटी बचाओ बेटी पढाओ या रॅलीमध्ये अरुण इगवे, प्रा. युसुफ मुल्ला,करीम शेख,अविनाश साळुंके, बालाजी मद्रे,परमेश्वर सुतार,विवेकानंद पाचंगे,भीम गुरुजी सुरवसे,रणजीत पाचंगे,अमृत तोरखडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रस्तावीक राजेंद्र सगर यांनी केले तर आभार परमेश्वर सुतार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *