उस्मानाबाद : जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे संकल्पनेतुन उपक्रम जागतिक महिला दिनानिमीत्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय उस्मानाबाद रायफल शुटिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत नेमबाजी प्रशिक्षण कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतुन आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिला महिला अंमलदार यांनी संख्येने उर्स्फुतपणे सहभाग घेउन नेमबाजीचा आनंद लुटला. तसेच मान्यवरांच्या हस्ते नेमबाजी स्पर्धेत राष्ट्रीय व राज्य पातळीवर चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंचा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या हास्ते सत्कार करण्यात आला.
पोलीस मुख्यालयातील इनडोअर फायरबट येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. महिमा माथुर- कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री नवनीत कॉवत, क्रिडा अधिकारी श्री. लटके, उस्मानाबाद रायफल शुटिंग क्लबचे संस्थापक अध्यक्ष तथा कोच अजीम शेख, लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या संधीवात तज्ञ डॉ. अमरीन काझी यांची प्रमुख उपस्थितीत होते. बोलताना पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब म्हणाले की, महिला देखील प्रत्येक श्रेत्रामध्ये समर्थपणे पुढे येत आहेत.
शुटींग स्पर्धेमध्ये महिला पोलीस अधिकारी व महिला अंमलदार यांनी भाग घेवून पुढे राष्ट्रीय पातळीवर देखील यश मिळवले पाहिजे.असे सांगून महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना त्यांनी शुभेच्छादिल्या. उपस्थितीत मान्यवरांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन उस्मानाबाद जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणारी खेळाडू सोयबा सिद्दीकी, राज्यस्तरीय स्पर्धेतील खेळाडू श्रावणी चौधरी, राबिया सिद्दीकी, आदित्य ओहाळृ राज कुह्राडे,रुद्रप्रताप जाधव, आयान अली, मुस्तफा अली सय्यद, रेहान काझी,गतिक चौहान, अमीन शेख यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या हास्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी राखीव पोलीस निरीक्षक आरविंद दुबे, डॉ. अजीम शेख, तौफीक सिद्दीकी, अफसर अफसर सय्यद आदिंनी परिश्रम घेतले.

प्रतिनिधी आयुब शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *