अहमदनगर : जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात शिराळ येथे रविवारी दुपारी जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे.शिराळ येथे पोपट लक्ष्मण घोरपडे वय वर्ष 52 व हनुमंत घोरपडे यांच्यात जमिनीच्या वादातून दुर्गा माता मंदिराजवळ रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वाद झाला त्यानंतर झालेल्या हाणामारीत पोपट घोरपडे यांना पायाला व हाताला जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.शिराळमध्ये हाणामारीत एकाचा खून झाल्याची घटना समजताच शेवगाव पाथर्डीचे डीवायएसपी अनिल कातकाडे,पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील,रामेश्वर कायंदे,सचिन लिमकर यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.मारहाणीत एकाचा खून झाल्याने शिराळमध्ये वातावरण तणावपूर्ण बनले असून पोलीस प्रशासनाकडून या घटनेबाबत अधिक तपास करण्याचे काम सुरू झाले आहे.गावात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस हवालदार विजय भिंगारदिवे,अनिल बडे,आप्पासाहेब वैद्य,पोपट आव्हाड,राजेंद्र सुद्रिक,सचिन मिरपगार,देविदास तांदळे यांच्यासह पोलीस कर्मचारी शिराळमध्ये ठाण मांडून आहेत.या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

भिवसेन टेमकर

पाथर्डी, नं. 9373489851

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *