संवेदनशिल मनाचे दर्दी अशोकभाऊ परळीकर यांच्या जीवनातील आगळावेगळा प्रसंग


वाशिम:-वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरात वास्तव्यास असलेले सर्वपरिचीत मनमिळावु स्वभावाचे अशोकभाऊ परळीकर यांच्या जीवनात त्या ‘आशा’मुळे नवी कलाटणी आली आणी पाहतापाहता संपुर्ण महाराष्टात या व्यक्तीमत्वाची ओळख निर्माण होवुन आजही ते राजकीय आणी सामाजीक क्षेञात अधिराज्य गाजवत आहेत.
मंगरुळपीर शहरातील सुपरिचीत असलेले अशोकभाऊ परळीकर हे आज जरी करोडो रुपयाचे मालक असतील,राजकीय क्षेञातही महाराष्ट स्तरावर पद भुषवणारे राजकारणी व मुत्सदी असतील माञ ऐंशी च्या दशकानंतर हेच अशोकभाऊ परिस्थितीशी झगडत जीवनाला नवा आयाम देत होते.शैक्षणिक कारकिर्द सुरु असतांना काशिनाथराव परळीकर यांचे छोटेखानी होटेल होते.या हाॅटेलमध्ये त्यांना कपबशा धुत हाॅटेलमधिल कामगार करतात ती सर्व कामे करत असत.त्याकाळी काशिनाथराव परळीकर यांचे हाॅटेल खुप चालायचे.खेड्यापाड्यातील लोक या हाॅटेलमध्ये चहापाणी,नाष्टा करायला यायचे.हाॅटेलमधील जागा बसायला अपुरी पडत होती त्यामुळे लोक ऊन्हात ऊभे राहुन चहापाणी घ्यायचे.ही स्थीती जाणुन हाॅटेलच्या समोर काऊंटर पुढे एक पिंपळवृक्ष त्यावेळी काशिनाथ परळीकर यांनी लावला.या पिंपळवृक्षाला अशोकभाऊ न चुकता पाणी टाकायचे.पाहता पाहता या वृक्षाने विशालकाय रूप धारण करून सर्वांना सावलीचे एक हक्काचे ठिकाण बनले.आजही तो पिंपळवृक्ष ताठ मानेने ऊभा आहे.हाॅटेलव्यवसायाव्यतिरिक्त काहितरी वेगळं करायचं आणी आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा अशा माणस डोळ्यापुढे ठेवुन अशोकभाऊ परळीकर यांनी एक नवा व्यवसाय सुरु केला.आणी नेमका याचवेळी अशोकभाऊ परळीकर यांच्या जीवनात ‘आशा’ आली आणी त्यांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मीळाली.ही ‘आशा’ दुसरीतीसरी कुणी नसुन त्यांची आवडती मिनिबस होती.ऐंशीच्या दशकानंतर खेड्यापाड्यातुन लोकांना शहरात येण्यासाठी पुरेसे साधनं नव्हते.हिच गोष्ट हेरुन अशोकभाऊ परळीकर यांनी एक मिनिबस घेतली आणी त्या मिनिबसचे नाव ठेवले आशा.त्याकाळी नुकताच ‘आशा’ नावाचा जितेंद्रचा चिञपट रिलिज झाला होता.’आशावो के सावन मे……ऊमंगो की बहारो मे….मै खो जाऊ प्यार मे…….. हे आशा चिञपटातील गित पाहता पाहता सुपरहिट झाले.महत्वाची गोष्ट अशी की अशोकभाऊ परळीकर यांचा त्याकाळचा आवडिचा नायक म्हणजे जितेंद्र.अशोकभाऊ परळीकरही जितेंद्रासारखीच छबी असणारे व्यक्तिमत्व त्यामुळे त्याकाळचा ‘आशा’ चिञपट त्यांच्या संवेदनशिल मनाला चांगलाच भावला.नेहमी आशा चिञपटातील एव्हरग्रीन गाणे ते गुणगुणायचे.आपल्या आशा नाव दिलेल्या मिनिबसने पाहता पाहता सुसाट धाव घेत गाडी व्यवसायात ऊच्चांक गाठला.पुढे त्या ‘आशा’ सोबत अजुन नविन वाहणेही प्रवाशी ने आन करण्यासाठी त्यांनी घेतली त्यात कमांडर गाडीही होती.अशा अशोकभाऊ यांच्या ‘आशा’ ने जिवनाला कलाटणी दिली.पुढे त्यांनी व्यवसाय करायचे ठरवले आणी पाहता पाहता करोंडोंचे धनी झाले.नगरसेवक ते नगराध्यक्ष आणी आता राष्टवादीचे प्रदेश कार्यकारीनी सदस्य,पक्षनिरिक्षक असे महत्वाचे पदंही ते भुषवित आहे.घरात लक्ष्मी पायघळ्या घालते पण या संवेदनशिल मनाच्या अशोकभाऊ परळीकरांना जराही गर्व नाही.नेहमी जनसामांन्यासाठी झटणारे,सेवाभावी ऊपक्रम राबवणारे एक लोकहितवादी म्हणून त्यांची ओळख आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *