लातूर

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत आज गुरुवार दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी उदगीर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव हुडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी माजी सभापती शिवाजीराव हुडे यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, उदगीरचे माजी नगराध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश्वर निटुरे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर (मुन्ना)पाटील, उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव कुणाल बागबंदे, चाकूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास पाटील, लातूर जिल्हा काँग्रेस सोशल मीडियाचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, प्रताप शिंदे आदिसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिनिधी मोमीन हारून एन टीव्ही न्युज मराठी लातूर 9822699888 / 9850347529

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *