section and everything up until
* * @package Newsup */?> आम्हाला दोन मुली आहेत, आता मुलगा पाहिजे म्हणत प्राध्यापकाचा विद्यार्थीनीवर अत्याचार | Ntv News Marathi

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातील प्राध्यापकाने मुलगा पाहिजे म्हणत विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे याविषयी त्याच्या पत्नीने देखील तिला हे सर्व मान्य असल्याचे सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरा बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. विद्यापीठातील एका विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून प्राध्यापक डॉ. अशोक गुराप्पा बंडगर आणि पत्नी पल्लवी अशोक बंडगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर राहण्यासाठी पीडिता शहरात आल्यानंतर तिला वसतिगृहाऐवजी प्राध्यापक स्वत:च्या घरीच पेईंग गेस्ट म्हणून राहण्यास घेऊन गेले. घरी त्याच्या पत्नीनेही मुलीसारखी काळजी घेण्याचे आश्वासन दिले. जून 2022 मध्ये बंडगरने अनेकवेळा छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. जुलै 2022 मध्ये पहाटे हॉलमध्ये पीडिता झोपली असताना बंडगरने बळजबरीने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पाच ते सहा वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. जानेवारी 2023 मध्ये हा सर्व प्रकार बंडगरच्या पत्नीस सांगितला. तेव्हा तिने सर्व मला मान्य असल्याचे सांगितले. तू आता घर सोडून जाऊ नकोस. माझ्या पतीसोबतच लग्न कर, मला दोन मुली आहेत. आम्हाला मुलगा नाही. तुझ्यापासून आम्हाला एक मुलगा हवा असल्याचेही सांगितले. त्यानंतर बंडगरची पत्नीच विद्यार्थिनीला वारंवार त्याच्यासोबत बेडरूममध्ये पाठवत असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. एकंदरीतच या प्रकरणामुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *