मुलगा लक्ष्मण आकळे वांरवार पैशाची मागणी करत होता तसेच त्याच्या हिश्याची जमिन नावावर करून देण्याची मागणी करत होता
बेक्रिगं न्युज
सांगली जिल्ह्यातील बेडग येथे मुलाने वडिलांच्या अंगावर ट्राॅक्टर चालवून ठार मारले आहे ,गेल्या काही महिन्यांपासून वडिल असणारे दाजी गजानन आकळे वय 70 यांना त्यांचा मुलगा लक्ष्मण आकळे वांरवार पैशाची मागणी करत होता तसेच त्याच्या हिश्याची जमिन नावावर करून देण्याची मागणी करत होता

यातून बर्याचदा मुलगा व वडिलाच्यात वादावादी देखिल सुरु होती , वडील दाजी आकळे हे जमिन व पैसा देण्यास टाळाटाळ करीत होते या रागातून आज सकाळी दहाच्या दरम्यान मुलगा लक्ष्मण आकळे याने रस्त्याने चालत निघालेल्या वडिलांच्या अंगावर ट्राॅक्टर चालवून ठार केले

या बाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलगा लक्ष्मण आकळे यास ट्राॅक्टर सह अटक करण्यात आली आहे.