संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांनी त्यांची निवड जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बाजार समितीचे संचालक अनिल पावणे,युवा उद्योजक रवी सुर्यवंशी, संभाजी सुर्यवंशी, संतोष खैरे,दिग्विजय तेवरे,सुरज सुर्यवंशी,ओंकार लाखे,महेश लाखे,हणमंत लाखे,भरत जावळे प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील,नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील,युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजकेदार आटुगडे,सोशल मीडिया तालुकाध्यक्ष सुशांत कोळेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
विशाल सुर्यवंशी हे संघटनेत प्रदेश सरचिटणीस पदावर कार्यरत होते. त्यांनी २००५ पासून राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेत तालुका सरचिटणीस, तालुका उपाध्यक्ष व तालुकाध्यक्ष म्हणून काम
केले आहे. त्यांनी आपल्या तालुकाध्यक्ष पदाच्या १० वर्षाच्या कारकिर्दीत गांव कमिट्या आणि महाविद्यालयीन कमिट्या स्थापन करून विद्यार्थी-विद्यार्थिनींचे प्रश्न प्रभावीपणे सोडविले आहेत. त्यांनी आ.अरुणआण्णा लाड यांच्या निवडणुकीत मोलाचे योगदान केलेले आहे. त्यांनी प्रदेश सरचिटणीस म्हणून राज्यातील १६ जिल्ह्यांचा संघटनात्मक दौरा केलेला आहे.
फोटो ओळी- इस्लामपूर येथे राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे नूतन प्रदेश उपाध्यक्ष विशाल सुर्यवंशी यांचा सत्कार करताना माजी मंत्री आ.जयंतराव पाटील. समवेत अनिल पावणे,रवी सुर्यवंशी, संभाजी सुर्यवंशी व कार्यकर्ते.
प्रतिनिधी राहुल वाडकर