सांगली : जिल्ह्यातील मिरज तहसिल कार्यालयात आई वारसदार असणार्या जमिनिच्या संदर्भातिल निकाल तक्रारदार यांचे बाजुने देण्यासाठी मंडल अधिकारी यांनी संकणक कारकुना करवी लाच मागितली होती , हि लाच स्विकारताना लाच लुचपत विभागाने कारकुनास रंगेहाथ पकडले. निकाल तक्रारदार यांचे बाजूने देण्यासाठी मंडल अधिकारी धुळी यांनी सांगितले. त्यांचे कार्यालयात काम करीत असलेले समीर जमादार यांनी लाच मागितली होती. तक्रारदार यांच्याकडे ७०,००० रूपये लाचेची मागणी केली. त्यापैकी २५,००० रूपये देण्यास सांगून उर्वरीत ४५००० रूपये निकाल लागल्यानंतर देण्यास सांगितले.त्यानंतर राजवाडा परिसर मंडल अधिकारी कार्यालय, सांगली येथे सापळा लावला. समीर जमादार (वय ३६), संगणक ऑपरेटर (रा. ग्रामपंचायत जवळ मल्लेवाडी ता. मिरज जि. सांगली) याने लाच मागितली.त्यावेळी तक्रारदाराकडून २५,००० रुपये स्वीकारल्यानंतर त्यांना पकडण्यात आले.श्रीशैल ऊर्फ श्रीकांत विश्वनाथ घुळी (वय ५६, मुळ पद पुरवठा अव्वल कारकून, तहसील कार्यालय. अति कार्यभार मंडल अधिकारी कुपवाड, बुधगांव रा. शिवाजी नगर, दंडोबा रस्ता, मालगांव ता. मिरज जि. सांगली) यांना ताब्यात घेतले आहे.दोघांवरोधात सांगली शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केलेली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.या कारवाईत राजेश बनसोडे सुजय घाटगे, पोलीस उप अधीक्षक, गुरुदत्त मोरे पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार अविनाश सागर. सलीम मकानदार, संजय संकपाळ, अजित पाटील, तपासकामात मदत केली आहे.
