बुलढाणा : 31 ऑगस्ट रोजी मलकापुर बस स्थानक येथील चौकशी कार्यालयातील महिला कर्मचारी व बसस्थानकाचे डीएम दादाराव दराडे यांनी राज्य परिवहन महामंडळाचे नियमित ग्राहक व पत्रकारांशी गैरवर्तणूक,गैरव्यवहार व हुज्जत घातल्या प्रकरणी मलकापूर नगरातील माता महाकाली नगरवासियांनी दिनांक 1 सप्टेंबर रोजी माननीय डी.सी., विभागीय नियंत्रक कार्यालय, बुलढाणा. यांचे नावे निवेदन दिले आहे,
सविस्तर असे की, दिनांक 31 ऑगस्ट च्या दुपारनंतर मलकापुर बस स्थानक मधील चौकशी कार्यालयात कार्यरत महिला कर्मचारी सुजाता विलास वनारे यांना राज्य परिवहन महामंडळाचे नियमित ग्राहक गोविंदा दाने,आकाश बोरसे यांनी `अकोट´ गाडी बद्दल चौकशी केली असता संबंधित चौकशी कार्यालयातील महिला कर्मचारी यांनी सदर ग्राहकांशी गैरवर्तणूक व हुज्जत घातल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. या घटनेची माहिती पत्रकार बांधवांना मिळाली असता पत्रकार बांधव घटनास्थळी पोहोचली.सदर घटनेच्या ठिकाणी घडणाऱ्या घटनेचा व्हिडीओ पत्रकार बनवत असताना गैरवर्तणूक व हुज्जत घालणाऱ्या संबंधित कर्मचारी व डीएम यांनी विरोध केला. पत्रकारांनी संबंधित कर्मचाऱ्यांची व नियमित ग्राहकांची समजूत काढली असता त्यांच्याशीही सदरहू बस स्थानक चौकशी कार्यालयातील महिला कर्मचारी व बस्थानक डी. एम. यांनी पत्रकार बांधवांशीही गैरवर्तणूक केली असल्याचे निवेदनात नमूद आहे.तसेच, संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यावर कार्यवाहीची मागणी निवेदनात केली आहे,
आधीच कोरोना काळात राज्य परिवहन महामंडळ आर्थिक अडचणीत सापडली असताना. ग्राहकांची अशाप्रकारे गैरवर्तणूक केल्याने महामंडळाच्या ग्राहकां प्रतीच्या सेवेबद्दल शंका निर्माण झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्वरित अशा कर्मचाऱ्यांवर कार्यवाही न केल्यास ग्राहक नाराज होऊन बसच्या सेवेबद्दल नागरिकांच्या व ग्राहकांच्या मनात सेवा घेण्याची कुचराई निर्माण होईल. कारण चौकशी कार्यालयात कार्यरत चौकशी कर्मचारी हा शांतस्वभावाचा, स्मितहास्य ठेवणारा व ग्राहकांनी चौकशी संदर्भात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शांततेने देऊन ग्राहकांचे समाधान करणे अपेक्षित असते. तसेच बसस्थानकाच्या परिसरात होणाऱ्या तक्रारी व कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तणूक बद्दल डी एम यांनी बसच्या सेवा कार्याबद्दल ग्राहकांना अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे अपेक्षित असतें. परंतु सदर घटनेणे स्पष्ट होते की, बसच्या कर्मचाऱ्याकडून ग्राहकांना त्रास होत आहे. तातडीने वरिष्ठांनी दखल न घेतल्यास एसटी च्या सेवेबद्दल प्रश्न, शंका निर्माण होऊन एसटीची सेवा घेण्यास लोक नाकारतील.
