ग्रामपंचायतीच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत मार्कंडा (कं) अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मार्कंडा (कं) येथे कोरोणा लसीकरण ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ वनश्री चापले. ग्रामसेवक श्री राजकुमार अनंतूलवार. व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत कोरोणा लसीकरण करण्यात आले. ग्रामपंचायत मार्कंडा (कं) च्या वतीने आलापल्ली मसाहत . बामनपेठ. मार्कंडा (कं) येथील नागरिकांना मुनादीद्वारे कोरोना लसीकरण करून आपण आपली जबाबदारी घेण्याचे आव्हान करण्यात आले होते या आव्हानाला प्रतिसाद देत 18 वर्षावरील युवकांनी व नागरिकांनी आज आज प्राथमिक आरोग्य केंद्र मार्कंडा (कं) येथे कोरोना लसीकरणाचा लाभ घेतांना दिसून आले
कोरोना लस घेण्यापासून कोणीही वंचित राहू नये याकरिता ग्रामपंचायत मार्कंडा (कं) च्या वतीने शर्तीचे प्रयत्न केले जात आहे
गेल्या दीड वर्षापासून कोरोणा आजार रोखण्यासाठी ग्रामसेवक श्री राजकूमार अनंतूलवार हे नेहमी सतर्क असून गावात फवारणी करणे आजाराने असलेल्या घरी गृहभेट देऊन कोरोणा आजाराला कसे रोखता येईल याबद्दल माहिती देणे कोरंटाईम ठेवणे व कोरंटाईम असलेल्या नागरिकांना दररोज भेट देऊन त्यांची विचारपूस करीत होते अजूनही ग्रामसेवक श्री राजकुमार अनंतूलवार हे कोरोना आजार रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *