उस्मानाबाद/धाराशिव :-
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांची मुलगी अनोखी परी हिचा ९ वा वाढदिवस शासकीय स्त्री रुग्णालय उस्मानाबाद येथे दि.२९ मे सोमवार रोजी स्त्री जन्माचे स्वागत करुन साजरा करण्यात आला,हा कार्यक्रम गेली ८ वर्षांपासून सातत्याने स्त्री रुग्णालय येथे अनोखी परीच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येतो,स्त्री जातीच्या जन्मलेल्या १५ बाळाला कपडे व जन्म दिलेल्या बाळाच्या मातेला १५ साडी व गुलाब पुष्प आणि डिलीवरी करणा-या ४ साड्या कर्मचारी मावशींना मान्यवरांच्या हस्ते देऊन स्त्री जन्माचे स्वागत केले आणि अनोखी परी हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.विशेष म्हणजे या कार्यक्रमात केक कापला जात नाही,बेटी बचाओ बेटी पढाओ, स्त्री भ्रूणहत्या रोखुया स्त्री जन्माचे स्वागत करुया या सदराखाली हा कार्यक्रम घेण्यात येतो,सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी या कार्यक्रमाबद्दल कौतुक केले व छत्रपती शिवाजी महाराज यांना माता जिजाऊ तर संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माता रमाई यांची साथ होती,सासु सुनेचे नात आई मुलीचे झाले पाहिजे तरच स्त्रीचा सन्मान होईल,केंद्र सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ यावरती अनेक योजना राबविल्या जात आहेत,तर रजनी इंगळे सहीत इतर मान्यवरांनी अनोखी परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना स्त्री जन्माचे स्वागत सर्वांनी केले पाहिजे,स्त्री जन्माचा जन्म दर वाढला पाहिजे,मुलगी जन्माला आली की तिला आनंदाने स्विकारले पाहिजे,मुलगी ओझे नाही उद्याचा आधार आहे,ही भावना जोपासली गेली तर नक्कीच स्त्री जातीचा सन्मान होईल, मुलीला स्विकारा तिला शिकवा या देशातील सक्षम अशी इंदिरा गांधी,सुषमा स्वराज,कल्पना चावला,आय ए एस प्रियांका शर्मा,किरण बेदी सारख्या अन्य इतर भारताच्या लेकी घडु द्या.असा संदेश ही या कार्यक्रमातुन देण्यात आला.कार्यक्रमास सिनेट सदस्य डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे देविदास पाठक, सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे,प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.एम टे सुर्यवंशी,अंकुश उबाळे, संजय गजधने,राजेंद्र धावारे,बलभीम कांबळे,बाबा गुळीग,दिपक पांढरे,विष्णु घरबुडवे, अमोल मुंढे, कुंभार जळकोटकर,स्वराज जानराव,विशाल घरबुडवे, आयुष वाघमारे,अनुष वाघमारे,संबोधी गायकवाड, नम्रता गजधने,सिध्दी,अनुरथ,मेटर्न भंडारे मॅडम,प्रभावती माने,शेख संधी जाकेरा, माधुरी जाधव,चेतना तागडे,रजनी इंगळे,सुनिता शेजवाळ सहित कर्मचारी वर्ग व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भंडारी मॅडम यांनी केले तर प्रस्तावना संजय गजधने यांनी केली, आभार गणेश रानबा वाघमारे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *