(सचिन बिद्री :उमरगा)
राहुल पाटील हे उमरगा तालुक्याचे तहसीलदार पदावर रुजू असताना लाचलुचपत विभागाच्या वाळू प्रकरणी धाडेत लाच स्वीकारल्याबाबतचा ठपका लागला होता.श्री पाटील यांच्या कालखंडात श्रावण बाळ,निराधार,अपंग आदींच्या पगारी आणि शेतकऱ्यांच्या शेतीविषयक विविध अडचणी बाबतची प्रकरने तातडीने निकाली लागायची, एकूणच कुठलीच कामे प्रलंबित राहायची नाही.
दि 1 जून 2023 रोजी उमरग्याचे तत्कालीन तहसीलदार राहुल पाटील यांची नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यात झाल्याचे आदेश निघाले आहेत.सदरील आदेश तात्काळ अंमलात येत असून महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी,स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम,१९८१ मधील नियमांनुसार दिलेल्या विहित कालावधीत संबंधित अधिकारी यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी दि.०५ जून, २०२३ (म.पू.) रोजी पुर्वी रुजू होण्याची दक्षता घ्यावी.अन्यथा या पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा “अकार्यदिन” (dies non) म्हणून
गणला जाईल,असे आदेशीत करण्यात आले आहे.
संबंधित अधिकाऱ्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्विकारु नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते संबंधित अधिकाऱ्यांना मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.असेही यामध्ये म्हटले असून सदरहू आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रूजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून पदस्थापना रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक)नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लघंन करणारी असल्यामूळे, ती गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुध्द शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आणि सहसचिव डॉ माधव वीर यांच्या स्वाक्षरीने शासन आदेश काढण्यात आले आहे.