मोहिमेअंतर्गत एकूण सात गुन्हे :2 लाख रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त.

सचिन बिद्री :उमरगा

मा.आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजयजी सूर्यवंशी, सह-आयुक्त सुनिलजी चव्हाण तसेच विभागीय उपायुक्त,पी. एच. पवार यांच्या आदेशानुसार व उस्मानाबाद जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजय राठोड, प्र.निरीक्षक पी. जी. कदम, निरीक्षक सिमा तपासणी नाका
तलमोड र.वा.कडवे, प्र.निरीक्षक भरारी पथक उस्मानाबाद-लातुर चे पी. जी.कदम व या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी सामुहिकरित्या तुळजापूर तालुक्यातील खडकी तांडा,


दिपक नगर तांडा तसेच उमरगा तालुक्यातील पळसगाव तांडा, बेडगा शिवारामध्ये हातभटटी दारु निर्मीती
केंद्रावर छापे घालुन महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ नुसार ०३ वारस गुन्हे, ०३ बेवारस गुन्हे असे एकुण
०७ गुन्हे नोंदवून सदरच्या कारवाईमध्ये रसायन ३८०० लि., हातभटटी दारु १५० लि. मोटार सायकल ०३
जप्त करुन एकुण रुपये २,२७,३००/- किंमतीचा मुद्येमाल जप्त केलेला असुन सदरचा मुद्येमाल वाहतुकीय
योग्य नसल्याने जागीच नाश करण्यात आलेला आहे.


सदरच्या कारवाईमधील सहभागी अधिकारी निरीक्षक र. वा. कडवे, पी.जी. कदम, विजय पी
राठोड, दुय्यम निरीक्षक पी. बी. गोणारकर,एस.बी.सिद, एस. डी. चव्हाण, सुनिल कांबळे, भिमराव
ओहोळ, सदुनि अमर कोरे, राजेश गिरी, महेश कंकाळ व जवान.अविनाश गवंडी, कोडींबा
देशमुखे, तुषार नेर्लेकर,अभिजीत बोंगाणे,विनोद हजारे,आर.बी. ठाकुर, अनिल कोळी, लहु डोंबाळे,
विशाल चव्हाण, सुरेश वाघमोडे, वाहन चालक सर्वश्री अनिल सोनकांबळे,
एजाज शेख, संतोष
कलमले आदींचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *