सचिन बिद्री:उस्मानाबाद
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्यावतीने गुरूवार दिनांक ८ जून रोजी सकाळी डॉ.भालचंद्र ब्लड बँक सभागृह, लातूर येथे विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण सोहळा पार पडला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक डी.टी आंबेगावे तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर एल सी बी पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे,संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे,महिलाध्यक्षा डॉ.सुधाताई कांबळे, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य उपाध्यक्ष विशाल पवार, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा संघटक संजय राजुळे, जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, व पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व नवीन पदाधिकारी यांच्या निवडी करून निवड पत्र देण्यात आले यावेळी निलंगा तालुका उपाध्यक्षपदी चंद्रशेखर केंगार यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली.