वाशिम :- मंगरुळपीर पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गोगरी तहसील मंगरूळपीर तालुक्यातील शेलू बाजार बीट येथे छापा टाकून 7824 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधी सुपारी, तंबाखू व गुटखा जप्त करून एकावर गुन्हा दाखल केला. जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील हुड, पोउपानी अंकुश वडतकर, पोका मोहम्मद परसुवाले, पोका ठाकरे व पोका चिस्तलकर व आम्रपाली सोनोने यांनी सदर कारवाई करत आरोपींविरुद्ध कलम १८८, २७२, २७३ भादंवि दाखल केली आहे.सह-कलम 59 अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यांतर्गत वरील कारवाई करण्यात आली. आरोपी हा गोगरी गावातील रहिवासी असे कळले.याच शेलुबाजारमधील तर्हाळा गावात किराणा दुकानातही पोलीसांनी धाड टाकुन गुटखा जप्त केला आहे.अंकुश वडतकर, पोका मोहम्मद परसुवाले, पोका ठाकरे व पोका चिस्तळकर व आम्रपाली सोनोने यांना तराळा गावात प्रतिबंधित सुगंधित सुपारी व तंबाखूचा अवैध साठा व विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर बुधवार, 30 मे रोजी पंचांसमवेत गावात असलेल्या त्या दुकानात पंचांसमोर झडती घेतली असता
सरकारने बंदी घातलेला गुटखा आणि पान मसाल्याच्या पांढऱ्या पट्ट्या दिसत होत्या. तसेच विविध गुटखा कंपन्यांच्या पांढऱ्या व लाल रंगाचा गुटखा, पान मसाला अशा पिशव्याही जप्त करण्यात आल्या आहेत. पथकाने 7575 रुपये किमतीचा गुटखा व फ्लेवरयुक्त तंबाखू असा एकूण 7575 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तरहाळा गावातील सदर आरोपी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली आहे.निरीक्षक सुनील हुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश वडतकर, पोका मोहम्मद परसुवाले, पोका ठाकरे आणि पोका चिसलकर आणि आम्रपाली सोनोने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.सदराकारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणानले आहे.
प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206