लांबोटीचा 10 वर्षाचा तो बाबू घरातून एकटाच बॅग भरून निघाला अन् उमरगा गाठल्यावर…
( उमरगा प्रतिनिधी )
बाबू नावाचा जवळपास 11 वयोवर्षाचा मुलगा आपल्या पाठीवर बॅग अडकवून उमरगा एस टी स्टॅन्ड वर उतरला दि 11 जून रात्रीचे साडेनऊ वाजलेले होते.

सदर एस टी ही जत उमरगा होती कदाचित तो मुलगा सोलापूर हुन त्या बस मध्ये बसलेला असावा.बस मधून उमरगा स्टॅन्ड वर उतरताच तो रडू लागला तेंव्हा त्या बस मधील उमरगा शहरातील काही प्रवासी त्याची सहानुभूतीपूर्वक विचारपोस करू लागले पण त्याचे रडणे काही थांबत न्हवते, अनोळखी गाव, अनोळखी जणसमुदाय पाहून तो घाबरून गेला होता

तेंव्हा त्या प्रवश्यानी पत्रकार सचिन बिद्री यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती दिली तेंव्हा तत्परतेने सचिन बिद्री एस टी स्टॅन्ड परिसरात जाऊन मुलाला आपल्या जवळ घेतले आणि त्या मुलाला विश्वासात घेऊन स्टॅन्डच्या बाजूला असलेल्या हॉटेल प्रभात येथे घेऊन गेले आणि त्याला काही खाऊ दिले. जेवण केल्यावर तो काही क्षण विश्रांती घेतला आणि आपुलकीने विश्वासात घेतल्यावर बोलू लागला.त्याने त्याचे नाव बाबू उमेश बंडगर असे सांगितले. घरी आई वडील व लहान भाऊ आहेत असा म्हणाला पण बॅग घेऊन उमरगा का आलास या प्रश्नाचा स्पष्ट उत्तर तो काही देत न्हवता.

संबंधित मुलाचा एक फोटो काढून प्राप्त माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,उमरगा उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांना पाठवन्यात आले.पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवत सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासनाला या मुलाची पूर्ण माहिती पाठविली. रात्री जवळपास साडेदहा च्या सुमारास त्या मुलाला हॉटेल प्रभात मधून बिटअंमलदार बी डी कामत्कर यांनी पोलीस गाडीत उमरगा पोलीस ठाण्याला घेऊन गेले.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि डी वाय एस पि रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाणे स. पो. नी महेश क्षीरसागर आणि बिट अंमलदार बी डी कामत्कर यांच्या अथक प्रयत्नाने अखेर या मुलाच्या पालकांचा पता लागला. पालकपण या मुलाच्या शोधात सोलापूर शहरात शोधात होते त्यांनी लागलीच उमरगा पोलीस ठाणे गाठले आणि रात्री उशिरा अवघ्या 4 तासात त्या मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. उमरगा पोलिसांच्या प्रयत्नाला अवघ्या चार तासात यश लाभले पोलिसांची तत्परता या ठिकाणी दिसून आली.