पुणे :-
ऐतिहासिक,स्वामिनिष्ठ,स्वराज्यनिष्ठ सरदार ढमढेरे घराण्यातील ४० हून अधिक शूरवीरांची शौर्यगाथा संदर्भासहीत सांगणा-या ‘ मराठ्यांच्या इतिहासातील ढमढेरे सरदारांचे योगदान ‘ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा १५ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता अण्णाभाऊ साठे सभागृह पद्मावती,पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील अॅडव्होकेट सुहासराव ढमढेरे यांनी ही माहिती दिली.
सरदार जयसिंगराव ढमढेरे सांस्कृतिक व सामाजिक संस्था प्रकाशित व लेखक श्री.पांडूरंग बलकवडे, श्री.पद्माकर गोरे लिखित मराठ्यांच्या इतिहासातील ढमढेरे सरदारांचे योगदान या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या हस्ते आयोजित करण्यात आलेला आहे.
शिवाजीराजे भोसले तंजावर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या प्रकाशन सोहळा समारंभास महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, शिरूर विधानसभा मतदार संघाचे आमदार अशोक पवार, खेड विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीप मोहिते, लेखक पांडूरंग बलकवडे, लेखक पद्माकर गोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या पुस्तकात सरदार ढमढेरे घराण्यातील युगपुरूष श्रीमंत सरकार बाबाजी ढमढेरे , सरदार कान्होजी जेधे यांचा कुटूंब काबिला संरक्षित करण्याची जबाबदारी चोखपणे यशस्वी करणारे योद्धे तसेच छत्रपती राजाराम महाराजांचे अंगरक्षक दलाची जबाबदारी चोखपणे यशस्वी पार पाडणारे सरदार हरजी ढमढेरे , मुघलांच्या ६५ वर्षे ताब्यात असलेले पुणे परगणा स्वराज्यात परत जिंकून आणणारे सरदार वाकोजी ढमढेरे या़ंची महती सांगणारे हे पुस्तक आहे असे अॅडव्होकेट सुहासराव ढमढेरे यांनी सांगितले.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर जि.पुणे