विद्यूतरोहित्राची त्वरीत दुरूस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करा
शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील मोहनमळ्यातील विद्यूतरोहित्र जळाल्याने ग्रामस्थ ५ दिवसांपासून अंधारात आहेत. विद्यूतरोहित्राची दुरूस्ती त्वरीत करून वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्याची मागणी मोहनमळ्यातील ग्रामस्थांनी केली आहे.
तळेगाव ढमढेरे येथील मोहनमळ्यातील विद्यूतरोहित्राची क्षमता १०० केव्हीए असून हे विद्यूतरोहित्र ५५ दिवसांत ३ वेळा जळाले असून पाच दिवसांपूर्वी जळाल्यानंतर अद्याप नादुरूस्त अवस्थेत असून दुरूस्ती करण्यात आलेली नाही.
विद्यूत रोहित्र जळाल्याने ग्रामस्थांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय झालेली असून दुभत्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने दुध उत्पादनावर परिणाम होत आहे.
या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून विद्यूतरोहित्र जळाल्याने शेतीपिकांना पाणी देण्यासाठी मोठी गैरसोय होत असल्याचे शेतक-यांनी सांगितले.
या विद्यूतरोहित्राची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी मोहनमळा परिसरातील ग्रामस्थ, प्रगतशील शेतकरी शहाजीराव ढमढेरे, हरिभाऊ ढमढेरे, आदिनाथ ढमढेरे, बाळासाहेब ढमढेरे, विठ्ठलराव ढमढेरे, गणेशराव ढमढेरे, विष्णूपंत ढमढेरे, पिंटू जेधे, गोरख ढमढेरे, योगेश ढमढेरे यांनी केली आहे.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे शिरूर जि.पुणे