औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील अनेक गायरान जमिन धारक शेतकरी खुप मोठ्या अडचणीत सापडलेले आहे अगोदरच कोरोना महामारी चे संकट आणि त्या मधे पावसाअभावी मालांचे मोठे नुकसान आणि आता तर नविन संकटाशी लढावे लागत आहे ते संकट म्हनजे सोयगाव तालुक्यातील सावळदबारा , टिटवी , देव्हारी , पळसखेडा, अशा गावांमधे जी गायरान जमिन आहे ती जमिन सातबारा आणि आठ वरती पोटखराब दाखवील्यामुळे या गायरान जमिन धारक शेतक-यांना शेतातील पेरलेल्या पिकांचा चा विमा भरण्यासाठी खुप अडचण निर्माण होत आहे
सातबारा आणि आठचा उतारा या मधे पोटखराब दाखवल्यामुळे या गायरान जमिन धारक शेतक-यांना पिकांचा विमा भरता येत नाही आणि पिक कर्ज मिळविण्यासाठी सुद्धा या गायरान धारक शेतक-यांना मोठी अडचण निर्माण होत आहे चांगली कसदार आणि चालु वहातीची जमिन असुन पोटखराब का दाखविण्यात आली नेमका काय प्रकार आहे सध्या शेतक-यांना कळ्यालाच मार्ग नाही पिकांची खुप मोठी नुकसान झालेली आहे
सातबारा आठ उतारा या मधे या जमिन चा उल्लेख हा पोटखराब दाखविल्यामुळे गायरान धारक शेतकरी खुप मोठ्या संकटात सापडलेले आहे याकडे शासन प्रशासन कधी लक्ष देनार आणि पोटखराब हा उल्लेख निघनार की आयुष्य भर असाच राहनार अशी चर्चा सध्याला गायरान धारक शेतक-यांमधे होत आहे त्यामुळे हे गायरान जमिन धारक शेतकरी हवालदिल झालेले आहे
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद