section and everything up until
* * @package Newsup */?> आगामी काळात बहुजन समाज गुलामगिरीच्या विळाख्यात सापडलेला असेल-प्रा. डॉ.ऋषिकेश कांबळे यांचे प्रतिपादन | Ntv News Marathi

औरंगाबाद : दिनांक २९ / ६ / २०२३ रोजी निळे प्रतिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तर्फे निळे प्रतिक वृत्तपत्राचा चौदावा वर्धापण दिन साजरा करुन मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र टि.व्ही. सेंटर औरंगाबाद येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
सध्याचे आपले शैक्षणिक धोरण दिशाहीन आणि कुचकामी असल्यामुळे आगामी २५ वर्षात आपला बहुजन समाज कष्टकरी, शोषित समाज मोठ्या गुलामगिरीच्या विळाख्यात सापडलेला असेल,अशी भीती व्यक्त करणारे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत साहित्यिक तथा समीक्षक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केले. ते निळे प्रतीक संस्थेच्या वर्धापन दिन पुरस्कार सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमात बोलत होते. निळे प्रतिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे निळे प्रतीकच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजण करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. सतीश गायकवाड यांनी केले तर अध्यक्षस्थान पी.बी अंभोरे यांनी भूषविले. सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी वक्ते म्हणून बोलताना प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे म्हणाले की, १९२३ मध्ये देखील ब्रिटिश सरकारने सरकारी शाळा लोकल बोर्डाकडे हसतांरित केल्या. या निर्णयाची झळ बहुजन वर्गाला सहन करावी लागली. आजही १०० वर्षानंतर शिक्षणाची परिस्थिती ही केविलवाणी झालेली आहे. सध्याचे शैक्षणिक धोरण हे बहुजन वर्गाच्या भवितव्यासाठी हानिकारक आहे.त्यामुळे बहुजन वर्ग आगामी २५वर्षात गुलामगिरीत अडकलेला असेल अशी भीती प्रा. डॉ. कांबळे यांनी व्यक्त केली. शिक्षणाचे महत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तसेच महात्मा फुले,शाहू महाराजांनी ओळखलेले होते. शिक्षण प्रसारासाठी या महापुरुषांनी जोरदार प्रयत्न केले. डॉ.आंबेडकरांनी अनेकांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केलेले होते. बहुजन वर्गाने पुढील धोका लक्षात घेऊन सावध झाले पाहिजे. असा इशाराही डॉक्टर कांबळे यांनी दिला.वृत्तपत्राच्या भूमिकी विषयी बोलताना डॉ. कांबळे म्हणाले की, वृत्तपत्र चळवळीचे एक सस्त्र आहे. असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मानत असत.मूकनायक या वृत्तपत्रासाठी राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळात तीनशे रुपयांची धनराशी देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भरीव मदत केलेली होती. शाहू महाराज यांनी केलेली ही मदत सामाजिक जाणिवेतून केली होती याची आठवण कांबळे यांनी आपल्या भाषणातून करून दिली. संपादक रतन कुमार साळवे यांनी देखील निळे प्रतिक वृत्तपत्र सुरू करण्याचे आणि ते टिकवण्याचे जे धाडस दाखवले ते उल्लेखनीय आहे. निळे प्रतिक पंधराव्या वर्षात पदार्पण करीत आहे हे सत्य अभिमानास्पद आहे. निळे प्रतिक वृत्तपत्राची भरभराट व्हावी,या वृत्तपत्राची दैनिकात रूपांतर व्हावे अशी अपेक्षा डॉ.कांबळे यांनी व्यक्त केली. मी स्वतः निळेप्रतीक कडे सामान्यपणे बघत नाही. असे उद्गार त्यांनी काढले.

अध्यक्षीय भाषणात आंबेडकर बँकेचे अध्यक्ष पी.बी अंभोरे म्हणाले की,लोकशाही व्यवस्था टिकवायची असेल तर वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची ठरत असते. सध्याची स्थिती अत्यंत निकट आहे. वृत्तपत्र सध्या मोठ्या दडपणाखाली आहे.ही वृत्तपत्रे सरकारवर अंकुश ठेवू शकत नाही. वृत्तपत्राची मालकी ही भांडवलदारांकडे आहे. ही भांडवलदारी वृत्तपत्रे सरकारची बाजू उचलून धरतात.असे सांगून अंभोरे म्हणाले की आर्थिक बाजू कमजोर असल्यामुळे निळे प्रतीकला आपली वाटचाल सुरू ठेवणे कठीण झालेले आहे. एनडीटीव्ही या चॅनलची उदाहरण ही सध्याची मोठी शोकांतिका आहे.याकडेही अंभोरे यांनी लक्ष वेधले. रतनकुमार साळवे यांचा गौरव करताना अंभोरे म्हणाले की, रतन कुमार यांचा जनसंपर्क मोठा आहे, रतनकुमार हे अनेकांशी जोडलेले संपादक आहेत. सेल्फ मोटिवेटेड संपादक आहेत अशा शब्दात अंभोरे यांनी त्यांचा गौरव केला. सध्याच्या सरकारची वाटचाल ही जनहिताच्या दृष्टीने हानिकारक आहे. सार्वजनिक क्षेत्र धोक्यात आल्याकडे अंभोरे यांनी लक्ष वेधून घेतले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंबादास रगडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर व भूमिकेवर भाष्य केले.सामाजिक न्यायाचा व समतेचा रथ पुढे नेता येत नसेल तर किमान हा रथ मागे जाणार नाही असे काही काम करू नका अशी तळमळ रगडे यांनी सर्वा समोर मांडली. शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत याकडे रगडे यांनी लक्ष वेधून घेतले . ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार्थी डॉ.धोंडोपंत मानवतकर यांनी निळे प्रतीकच्या वाटचालीचा आढावा घेतला. संपदक रतन कुमार साळवे यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाचा त्यानी आवर्जून उल्लेख केला. भीम टेकडी बुद्ध विहाराच्या प्रा. धम्म दर्शना महाथेरी यांनी संपादक रतन कुमार साळवे यांच्या वाटचालीकडे लक्ष वेधून घेतले. संपादकांना किती संघर्ष करावा लागतो याचे काही उदाहरणे त्यांनी दिली. बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ग्रंथलेखन करणारे धनराज गोंडाणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,मी स्वतः निळे प्रतिकच्या टायटल मुळे प्रभावित झालो. आणि या वृत्तपत्रास आपण मदत केली पाहिजे हा विचार मी करत राहिलो. निळे प्रतीक सारखी वृत्तपत्रे चळवळीचा आधार बनलेले असतात. असे गोंडाने यांनी सांगितले. समाजाने दातृत्व जपले पाहिजे असेही ते म्हणाले. प्रमुख उपस्थित असलेले सतीश गायकवाड म्हणाले की, निळा रंग हा सर्वसमावेशक आहे यावरूनच निळे प्रतीच्या वाटचालीचा अंदाज येतो.संपादक उच्चशिक्षित असून उत्कृष्ट काम करतआहे. समाजातील अनेक घटनांचे ते साक्षीदार आहेत. असे गायकवाड यांनी सांगितले . आपले प्रास्तविक भाषण करताना रतनकुमार साळवें यांनी सांगितले की,वृत्तपत्र चालविताना व एखादा कार्यक्रम आयोजित करताना किती दमछाक होतो याचा अनुभव मी आजच नव्हे तर मागील १४ वर्षापासून घेत आहे.अनेक समाज बांधवांनी आपणास मोठी साथ दिलेली आहे.असे सगळ्यांच्या विषयी त्यांनी कृतज्ञता पूर्वक नमूद केले. यावेळी विचार मंचावर न्यायमूर्ती शंकर दाभाडे सह अनेकांची उपस्थिती होती न्याय मूर्ती शंकर दाभाडे, बाळुशेट आडगावकर यांचेही यावेळी भाषण झाले. या कार्यक्रमात ३० जणांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

यामध्ये समाजभूषण पुरस्कार, समाज रत्न पुरस्कार,साहित्यभूषण पुरस्कार, कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, विद्रोही कवी नामदेव ढसाळ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते रतन कुमार पंडागळे, वरिष्ठ पत्रकार ससो खंडाळकर, माणिक साळवे, ज्ञानेश्वर खंदारे, मुकुंद दादा सोनवणे, पंडित बोर्डे, प्रा.भारत शिरसाट, दौलत मोरे, रशपालसिंग अटल, प्रा.अंकुश शिंदे, व्ही के वाघ,आनंद बोरडे,अँड. रामटेके, लक्ष्मण भुतकर, कडुबाई खरात,मुकुंद सुरडकर,देविदास कोळेकर आर.बी.वानखेडे,सुधाकर आठवले,सुदाम मगर,लक्ष्मण भुतकर, आनंद बोरडे, बाजीराव सोनवणे,महेश मुरकुटे, बबन सोनवणे,संजय सोनखेडे,वसंत शिरसाट, गजानन इंगळे, भीमराव गाडेकर, सुधाकर निसर्गन, सुदाम मगर, अँड रामटेके, राजेश भोळे आदीसह मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल गवळी, टिनू साळवे, सोनू साळवे, सागर साळवे, अंश पवार, रतन गायकवाड, हिरासिंग महाले आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज शिंदे यांनी केले तर आभार राहुल गवळी यांनी मानले.

प्रतिनिधी जब्बार तडवी औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *