वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या वडगाव कोल्हाटी व कोल्हाटी गट नंबरमध्ये उद्योजकांना विद्युत पुरवठा संबंधित विविध समस्या होत्या. याबाबत मसिआने अखंडित वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महावितरणकडे मागणी केली होती. याची दखल घेत करोडी येथील उपकेंद्राला ३३ के. व्ही. छावणी फिडरवरून जोडण्यात आला. याचे उदघाटन महावितरणचे संचालक डॉ. मंगेश गोंदवले यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.
यावेळी मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे, अधीक्षक अभियंता प्रविण दरोली, मसिआचे अध्यक्ष अनिल पार्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत गट नंबरमधील उद्योजकांना विद्युत पुरवठयासंबंधी विविध समस्या असून मागील १० वर्षांपासून येथील उद्योजकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी मसिआने सातत्याने पाठपुरावा केला होतो. अखंडित वीज मिळत नसल्यामुळे येथील उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यावर पर्याय म्हणून करोडी उपकेंद्राला होणारा विद्युत पुरवठा हा सोमवारपासून ३३ केव्ही छावणी फिडरवर जोडण्यात आला. अखंडित विद्युत पुरवठा मिळावा यासाठी नवीन वीजवाहिनी टाकण्यात आली असून यामुळे उद्योजकांना अखंडित वीजपुरवठा होणार आहे. यानंतर मसिआच्या वाळूज येथे सर्व अधिकारी आणि मसिआचे पदाधिकारी आणि गट नंबर मधील उद्योजकांची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष अनिल पाटील यांनी या विद्युत पुरवठयामुळे उद्योजकांना दिलासा मिळणार असल्याचे सांगून सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच औद्योगिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक ते सहकार्य नेहमीच असेल असे आश्वासन महावितरणचे संचालक डॉ. मंगेश गोंदवले यांनी दिले. यावेळी उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड, कमलाकर पाटील, अब्दुल शेख, राहुल मोगले, शरद चोपडे, दुष्यंत आठवले, अधिकारी विष्णु ढाकणे, राहुल चोरडिया, सचिन देशमुख, नीलेश कुंडे, संदीप अग्रे, श्रीकांत भांगे, विजय शिर्के, नारायण धाइत, अशोक मोहरुत, पंढरीनाथ देवकर, शामराव सोमवंशी यांच्यासह उद्योजकांची उपस्थिती होती.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद.
मो.8484818400