महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली असून, ते लवकरच कार्यान्वीत होणार असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
दरम्यान, वाळूज औद्योगिक वसाहत व परिसराची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. यातच वाळूज हा परिसर औद्योगिक वसाहतीचा परिसर असल्याने मोठ्या प्रमाणात देशभरातून कामगार वर्ग इथे स्थायीक झाला आहे. शिवाय शेकडो कारखाने येथे असून, पुरूषांसह महिलावर्गही मोठ्या प्रमाणात कंपनीत कर्मचारी व कामगार म्हणून कार्यरत आहेत. शिवाय अनेक मुले मुली शाळा महाविद्यालयात शिकण्यासाठी स्थानिक परिसरातून शहरात ये-जा करतात. यातूनच अनेकदा मुली व महिलांवर अत्याचार होता आहेत. तसेच पळून जाण्याचे प्रमाणही अधिक आहे. शिवाय रोडरोमिओंचा त्रासही सहन करावा लागत आहे. याची दखल घेत पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी एमआयडीसी वाळूज व वाळूज पोलिसांच्या विनंतीवरून या परिसरासाठी स्वतंत्र दामिनी पथकास मंजुरी दिली आहे. हे पथक लवकरच एमआयडीसी वाळूज सह वाळूज पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात: स्थापना करण्यात येणार आहे. या पथकात पोलीस व्हॅन, एक पुरूष कर्मचारी, तीन अनुभवी महिला पोलीस अंमलदार असे पथक राहील. हे पथक दररोज सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी कार्यरत राहणार आहे. यामुळे महिलांना बिनधास्त फिरता येणार असून काही अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ दामिनी पथकाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी केले आहे.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद.
मो.8484818400