औरंगाबाद
सोयगाव तालुक्यामधे सावळदबारा व इतर गावांचे अनेक शेतकरी पीक विमा योजने पासुन वंचित आहे हा प्रकार बरेच वर्षांपासुन सुरुच आहे दरवर्षी गायरान जमीन धारक शेतकरी शेतु आणि सि. एस. सि. सेंटर वरती आपल्या शेतामधे पेरनी करुन लागवड केलेल्या पीकांचा पीक विमा भरण्यासाठी जात असतात परंतु सोयगाव महसुल विभागाने त्यांची पुर्ण जमिन सातबारा पोटखराब दाखवुन शेतक-यांचे मोठे नुकसान करुन ठेवलेले आहे या संदर्भामधे या गायरान जमीन धारक शेतक-यांनी अनेक वेळेस सोयगाव तहसिल ला जाऊन ही समश्या सांगितली परंतु या गंभीर प्रकाराकडे शासनाचे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसुन येत एकीकडे शासन म्हणतं शेतक-यांसाठी एक रुपयामधे पीक विमा भरण्याची योजना आहे
तर दुसरीकडे गायरान जमीन धारकांची चालु वहितीची जमीन असुनही त्या जमीनीला मुद्दाम पोट खराब दाखवुन शेतक-यांना योजनांपासुन वंचित ठेवण्याचा धक्कादायक प्रकार सोयगाव महसुल चे कर्मचारी अधीकारी करित आहे हे शेतकरी पीक विमा भरण्यासाठी गेले असता त्यांची चांगली योग्य चालु जमीन पोटखराब करुन ठेवल्यामुळे पीक विमा भरल्या जात नसल्यामुळे गायरान जमीन धारक शेतकरी हे निराश होऊन घरी परत येतात हा गंभीर प्रकार सोयगाव महसुल विभागाच्या कर्मचा-यांनी करुन ठेवलेला आहे बरेच वर्षांपासुन हे गायरान धारक शेतकरी पीक विमा भरण्यापासुन वंचित राहत आहे त्यामुळे या शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे वरिष्ट अधीकारी आणि शासन याची काळजी दखल घेऊन न्याय देईल का की या गायरान धारक शेतक-यांवरती अन्याय करुन त्यांना वा-यावरती सोडले जाईल असा प्रश्न या शेतक-यांना पडलेला आहे
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद