औरंगाबाद ते नगर महामार्गावरील तिसगाव हद्दीतील ए. एस. क्लब ते लिंक रोड वाहतूक सिग्नलवर वाहतूक पोलीस प्रशासनाकडून वाहनधारकांची आर्थिक लूट करण्यात येत आहे. सिग्नलमधील तांत्रिक चुकीचा वाहनधारकांना मोठा फटका बसत आहे. प्रशासनाच्या तांत्रिक चुकीमुळे वाहतूक पोलीस वाहनधारकांना आर्थिक दंड आकारत असल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे वाहतूक प्रशासनाने तत्काल सिग्नलमधील तांत्रिक बिघाडाची दुरुस्ती करून लूट थांबवावी, अशी मागणी सिडको वाळूज महानगर बचाव समितीच्यावतीने अध्यक्ष नागेश कुठारे यांच्या शिष्टमंडळाने वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली आहे
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळूज औरंगाबाद