स्थानिक गुन्हे शाखा औरंगाबाद ग्रामीणची मोठी कारवाई
औरंगाबाद
दिनांक २७/०७/२०२३ रोजी फिर्यादी नामे निसार मंजूर शेख वय ३३ वर्ष, व्यवसाय ट्रक चालक रा. गल्ली नं. १२, प्लॉट नं. १५, काद्रीयाकॉलनी, मिसारवाडी, औरंगाबाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पो.स्टे चिकलठाणा गुरन- ३११ / २०२३ कलम ३७९ भा.द.वी प्रमाणे गुन्हा दाखल होता.
मनिष कलवानीया पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस ठाणे चिकलठाणा यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा नमुद गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना सतीष वाघ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि नमुद गुन्हयातील फिर्यादी नामे निसार मंजूर शेख यांनेच त्यांचे इतर साथीदारासह इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी ट्रक व त्यातील लोखंडी सळई चोरी केल्याचा बनाव करून खोटी फिर्याद दाखल केली आहे.यावरुन दि. ३०/०७/२०२३ रोजी सतिष वाघ पो. नि. स्थागुशा व त्यांचे पथकाने गुन्हयातील फिर्यादी निसार मंजूर शेख यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन ट्रक चोरी झालेले बाबत त्याचे हालचाली या संशयीत असल्याबाबत खात्री झाल्यानंतर त्याला स्था.गु.शा पथकांने ताब्यात घेतले त्याला ट्रक व त्यातील सळई चोरी बाबत कसून चौकशी केली असता तो पोलीसांना सुरूवातीला उडवा उडवीचे उत्तरे देवु लागला यावरुन त्याचेवर अधिक संशय बळावल्याने त्यास विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांने सांगितले कि त्यांने त्यांचे ट्रकवरिल लावण्यात आलेले जीपीआरएस सिस्टम काढून ते इतर वाहनावर टाकुन दिले होते. ज्यामुळे पोलीस हे त्याचे ट्रक चोरी गेल्याचा समज करून त्याने जिपीआरएस टाकुन दिलेल्या ट्रकचा पाठलाग करतील व त्या तपासात पोलीस व्यस्त राहितील. व त्याला ट्रक चोरी गेल्याबाबत त्या गाडीचे इन्शुरन्स क्लेम मिळुन जाईल तसेच गाडीतील सळाईची विक्री करणार असुन यासाठी त्याला त्याचा साथीदार नामे रिजावान आरीफ शेख वय २७ वर्ष रा. मास्टर कॉलनी जळगांव यांनी मिळून केला असून नमूद ट्रक पहूर ता. जामनेर जि. जळगांव येथे लपवून ठेवला असल्याचेही सांगितले आहे.
यावरून स्था.गु.शा पोलीस पथकाने पहूर येथे जावून सदर चोरी गेलेला ट्रक किंमत १४,०००,००/- रूपये व त्यातील लोखंडी सळाई किंमत ११,०८, ५९४/- रूपये मोबाईल असा एकूण २५,१३,५९४/- रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
नमूद गुन्हयातील आरोपी नामे १) निसार मंजूर शेख वय ३३ वर्ष, व्यवसाय ट्रक चालक रा. गल्ली नं. १२, प्लॉट नं. १५, काद्रीयाकॉलनी, मिसारवाडी, औरंगाबाद २) रिजावान आरीफ शेख वय २७ वर्ष रा. मास्टर कॉलनी जळगांव यांना पुढील तपासकामी पो.स्टे चिकलठाणा येथे हजर केले आहे.नमुद गुन्हाचा तपास पोलीस ठाणे चिकलठाणा करीत आहे तपासामध्ये आरोपी कडुन आणखी गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी औरंगाबाद पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया, सुनिल कृष्णा लांजेवार, अप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, स.पो.नि.सुधीर मोटे, पो.उप.नि. विजय जाधव, पो.उप.नि. भगतसिंग दुलत, पोह/ लहु थोटे, नामदेव शिरसाठ, संजय घुगे, श्रीमंत भालेराव, मपोह / जनाबाई चव्हाण, मनिषा चौधरी, पोह/ रवी लोखंडे, वाल्मीक निकम, पोना / दिपक सुरोशे, नरेंद्र खंदारे, विजय धुमाळ, गणेश सोनवणे, पोअ / आनंद घाटेश्वर, योगेश तरमाळे, जिवन घोलप चालक पोअ / संजय तांदळे, संतोष डमाळे यांनी केली आहे.
रिपोर्टर जब्बार तडवी औरंगाबाद