पोलीसांची व्यावसायीक नेपुण्य, गुणवत्ता कौशल्य कार्यक्षमता व दर्जा वाढविणे व त्याची पडताळणी करणे याकरिता प्रत्येक वर्षी पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात
नळदुर्ग पोलीस ठाणे रुजू झाल्यापासून
खाकीचा धाक दाखवत
उत्कृष्ट पोलीस कार्यपद्धती, गुन्हेगारी प्रतिबंध, गुन्ह्यांचा त्वरित तपास आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना प्रोत्साहित करण्यासाठीच्या योजना, अशा निकषांमध्ये नळदुर्ग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पवनकुमार अंधारे पोलीस “उत्कृष्ट पोलीस” कार्यपद्धत मध्ये अव्वल ठरले आहेत.
यांच्या कार्याची दखल घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यापूर्वी देखील त्यांनी अनेक ठिकाणी उल्लेखनीय कार्य केले आहेत त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. त्यानंतर
नळदुर्ग पोलीस ठाण्यात रुजू झाल्यापासून खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोड्या अशा शीर्षकाखाली दाखल होणारे गंभीर गुन्हे, तपासावर प्रलंबित राहणाऱ्या गुन्ह्यांची संख्या, अवैध धंद्यांवरील प्रभावी कारवाई .
जातीय व सामाजिक सलोखा टिकविणे, अशा विविध मुद्द्यांसाठी नागरिकांसाठी प्रत्येक वेळी अधिक चांगल्या दृष्टीने काम करताना दिसून येत आहेत.
या पुरस्कारानंतरही अधिक चांगले काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
“जनतेच्या रक्षणासाठी,
समाजात शांतता सलोखा राखण्यासाठी तहान-भूक विसरून, कुटुंबियांना अंतर देत अहोरात्र राबणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पवन कुमार अंधारे यांनी व्यक्त केले .
उस्मानाबाद येथे आयोजित केलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालय येथे दि. ५ -५ -२०२३ रोजी
विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी. अपर पोलीस अधीक्षक नवनीत कावत . व इतर कर्मचारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पुरस्काराचे मानकरी ठरल्याने शहरात गावात मित्र परिवारामध्ये अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
प्रतिनिधी आयुब शेख