तुळजापूर तालुक्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून डॉ निलेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.
तुळजापूरच्या तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सई भोरे -पाटील यांची अकलूज या ठिकाणी बदली झाली असून रिक्त असलेल्या पदावर त देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या कार्यालयाच्या अंतर्गत नळदुर्ग तामळवाडी,तुळजापूर ही पोलीस ठाणे व त्या अंतर्गतची मोठे गावे येतात. डॉ .निलेश देशमुख सिंघम पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात .
फिल्मी स्टाइलनं केलेल्या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यात दहिवडी तालुक्यात अवैध कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते.आता तुळजापूर तालुक्यात नव्याने रुजू होताच येथील असलेले अवैध धंदेवाल्यांचे नाव ऐकताच झोप मोड झाली आहे अशी वार्ता समोर येत आहे. तुळजापूर तालुक्याचा पदभार स्वीकारताच सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षा होताना दिसून येत आहे.
प्रतिनिधी आयुब शेख तुळजापूर