तुळजापूर तालुक्यातील निलेगाव गावात एका बारा वर्षांच्या मुलाच्या बाबतीत घडली

मांजर चावल्याचे निमित्त झाले आणि सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यापूर्वीच बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. नोमान उस्मान पटेल (वय- १२) असे मृत्यू पावलेल्या मुलाचं नाव आहे.
यातील मुलगा नोमान पटेल हा इटकळ (ता. तुळजापूर) या गावी आपल्या कुटुंबासमवेत राहतो. रात्री आठच्या सुमारास मांजराने त्याच्या उजव्या पायाला चावा घेतला. यामुळे त्रास होऊ लागला. रात्रीची वेळ असल्याने काही तास घरामध्येच घालवले. पहाटे गावातून सोलापूरला शासकीय रुग्णालयात पावणेपाचच्या सुमारास वडील उस्मान यांनी दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने तपासणी केली. मात्र, दवाखान्यात आणण्यास उशीर झाला होता. त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे त्यांनी घोषित केले. सिव्हिल पोलिस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे

प्रतिनिधि इरफान शेखदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *