तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी २३ रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास येडोळा तांड्यावर धाड मारून हातभट्टी दारू गाळपाच्या भट्टया उध्वस्त केल्या आहेत. यावेळी ७ हजार २०० लिटर हातभट्टी दारू व दारू तयार करण्याचे रसायन पोलिसांना मिळुन आले. याची किंमत ३ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येडोळा तांडा येथे हातभट्टी दारू गाळप करण्याच्या भट्टया चालु असल्याची माहिती नळदुर्ग पोलिसांना मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत कावत व तुळजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे,बीट अंमलदार उमाजी गायकवाड,पोलिस हवालदार शंकर राठोड, महिला अंमलदार विजयश्री होनराव व पोलिस हवालदार सुरेश सगर यांनी.२३ जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास येडोळा तांड्यावर धाडसी कारवाई करीत त्याठिकाणी सुरु असलेल्या हातभट्टी दारू गाळपाच्या भट्टया उध्वस्त करून टाकल्या.येडोळा येथील भगवनसिंग परिहार यांच्या शेताजवळ बोरी नदीच्या पात्रात छापा मारून रवी धोंडीबा राठोड याच्या कब्जातुन ३६ लिटर हातभट्टी दारू व १ लाख ८० हजार रुपयांचे हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन मिळुन आले.मंगलाबाई धोंडीबा राठोड यांच्या कब्जातुन १ लाख १० हजार रुपये किमतीचे २२०० लिटर दारू हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन मिळुन आले. तसेच लक्ष्मी प्रकाश आडे रा. अक्कलकोट रोड नळदुर्ग यांच्या कब्जा तुन ७० हजार रुपयांचे हातभट्टी दारू व हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन मिळुन आले. या धाडीत पोलिसांनी ७ हजार २०० लिटर हातभट्टी दारू व दारू तयार करण्याचे रसायन एकुण किंमत ३ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नळदुर्ग पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे नागरीकांच्या वतीने स्वागत केले जात आहे.
प्रतिनिधी( आयुब शेख)