हिंगोली : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बन ता. सेनगाव जि.हिंगोली येथील उपक्रमशील शिक्षक श्री. राजेंद्र माणिकराव पालवे यांची केंद्र सरकारच्या कला व सांस्कृतिक विभागाच्या वतीने नवी दिल्ली येथे राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
या राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील 10 शिक्षकांची निवड करण्यात आलेली आहे. त्यात हिंगोली जिल्ह्यातून राजेंद्र पालवे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत पुणे शिक्षण उपसंचालक यांच्या पत्राद्वारे ही निवड करण्यात आली आहे. ”वस्तुसंग्रहालयांची शालेय शिक्षणातील भूमिका” असा या प्रशिक्षणाचा विषय आहे. हे प्रशिक्षण 21 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2023 दरम्यान सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्र, द्वारका, नवी दिल्ली येथे संपन्न होणार आहे. याआधी राजेंद्र पालवे सर यांनी गुवाहाटी, उदयपूर व भुवनेश्वर या ठिकाणी वेगवेगळ्या विषयाची तीन राष्ट्रीय प्रशिक्षणे यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहेत.
या निवडीबद्दल शिक्षणाधिकारी मा. सोनटक्के साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री. गव्हाणे साहेब, केंद्रप्रमुख श्री आंधळे सर, मुख्याध्यापक, सर्व सहकारी शिक्षक, शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती, बन, पालक व मित्र परिवाराने श्री.राजेंद्र पालवे सर यांचे अभिनंदन केले.
प्रतिनिधि महादेव हारण
सेनगाव हिंगोली