सेनगाव तालुक्यातील माझोड येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानबा सरकटे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नवोदय विद्यालयात निवड झालेल्या दोन विद्यार्थीनी कु. प्रगती वाळले
कु. नम्रता पडघन या दोन्ही विद्यार्थ्यांनीचा सत्कार करून
माधव श्रीराम मगर यांच्या कडून प्रत्येकी एका मुलीला 2100₹,2100₹ रुपये बक्षीस देण्यात आले तर शिक्षक सुनिल बोरकर सर यांच्या करून प्रोत्साहन पर बक्षीस म्हणून 1000₹,1000 रुपये
आणि वसुदेव ठाकरे सरान कडून
प्रत्येकी 500₹,500 ₹ बक्षीस देण्यात आले ध्वजारोहण कार्यक्रमाला मगर सर, बोरकर सर, खानझोडे सर, ठाकरे सर, कुटे सर, इंगळे सर, लक्ष्मण इंगळे सर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानबा सरकटे,माझोड येथील सरपंच सौ. कविता सुरेश मुळे, सुरेश मुळे ग्रामसेवक रामप्रसाद खिल्लारी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.राधाबाई हनुमान लांडगे, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक वर्ग, माता पालक, अंगणवाडी ताई सेविका, मदतनीस, आशावर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होते.