सचिन बिद्री:धाराशिव
मराठवाडा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्वानिमित्ताने मराठवाडा अमृत संवाद हा उपक्रम प्रा.राजेंद्र चव्हाण यांनी राबविला.विविध 75 विषयांवर अखंड 75 दिवस
व्याख्याने देण्याचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला आहे. श्री चव्हाण हे गुगळगांव ता.उमरगा जि.धाराशिवचे रहिवाशी असून ते सध्या उदगीर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत,विशेष म्हणजे ते नेत्रहीन आहेत.
या व्याख्यानाद्वारे मराठवाडयाचा इतिहास,मराठवाडयातील प्रश्न मांडत असतानाच युवक युवतींच्या उपयोगी पडतील असे ज्वलंत विषय त्यांनी हाताळले.ही व्याख्याने ऑफलाईन तसेच ऑनलाईन स्वरूपात
पार पडली.या दरम्यान त्यांनी सुमारे 23000 विद्यार्थी आणि 300 शिक्षक यांच्याशी संवाद साधला.त्यांना शिक्षक विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.सर्व व्याख्याने श्री चव्हाण यांनी कोणत्याही मानधनाशिवाय एक सामाजिक कर्तव्य म्हणून दिलेली आहेत. स्वार्थाशिवाय प्रेम करणे हे मानवतेची उच्च कल्पना आहे.
ही कल्पना त्यांनी आपल्या परीने प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे.स्वातंत्र्य सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे,नव्या कल्पना-संकल्पना
नविन पिढीपर्यत पोहचविणे.नव्या पिढीला आपल्या प्रदेशाविषयीच्या कर्तव्याची जाणीव निर्माण करून देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे असे ते यावेळी म्हणाले.
प्रा. राजेंद्र चव्हाण हे गेल्या 12 वर्षापासून शिक्षक, सुत्रसंचालक आणि वक्ते म्हणून कार्यरत आहेत.