हा एका महान लढवय्या स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान न्हवे का..?
(सचिन बिद्री:उमरगा)
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले आमदार, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या सशस्त्र लढ्यातील अग्रनी, निजामांच्या हद्दीतील रझाकार व पोलिसांच्या छावन्यावर हल्ला करणारे कॅम्प चे प्रमुख योद्धा विश्वभरराव(दादा)नामदेव हराळकर यांच्या नावाचा महाराष्ट्र शासन व प्रशासनाला आजच्या मराठवाडा मुक्ती दिनाला का विसर पडला..? असा संतप्त सवाल उमरगा लोहारा तालुक्यातील जनतेतून सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जात आहे.
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत मोहत्सवी वर्षात महाराष्ट्र शासनाने अश्या दिवंगत स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यासाठी एक नामफलक घरी जाऊन प्रदान करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पण विश्वमभरराव (दादा)नामदेवराव हराळकर यांच्या कुटुंबीयांना शासन किंवा प्रशासनातील कोणीही साधा संपर्क सुद्धा साधला नाही. हा शासन प्रशासनातर्फे एका स्वतंत्र्य सैनिकाचा अपमान न्हवे का..? असा संतप्त आक्रोश जनतेतून व्यक्त होत आहे.
विश्वमभरराव नामदेवराव हराळकर (दादा) म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या सशस्त्र लढ्यातील एक अग्रणी नाव.घोळसगाव कॅम्पचे ते प्रमुख होते,त्यांच्यातील संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी परिसरातील अनेक तरुणांना एकत्रित करून सोलापूर जिल्ह्यातपण अगदी धाराशिव जिल्ह्याच्या शिवेवर असलेल्या घोळसगाव येथे एक कॅम्प तयार करून निझाम हद्दीतील रझाकार व पोलीस छावण्यावर हल्ला करून निझाम प्रशासनास जेरीला आणण्याचे काम केले.ते स्वातंत्र्यसैनिक गौरव समितीचे अध्यक्षपद उत्तम रित्या भूषविले आहे आणि आजच्या दिवशीच शासन प्रशासनाला त्यांच्या नावाचा विसर पडणे यामुळे गावागावातून आणि शहरी भागातून संतापाची लाट उसळत आहे आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त केला जात आहे.
सदर घटनेवर जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे काय निर्णय घेणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
एक दृष्टीक्षेप या थोर स्वातंत्र्य सैनिकाच्या कार्यावर
मुलत: उमरगा तालुक्यातील तुगांव या लहानश्या गावातील हराळकर कुटुंबात जन्मलेले विश्वभरराव (दादा) हराळकर यांचे शिक्षण हिप्परगा राव येथील शाळेत झाला.रामानंद तीर्थ यांच्यासोबत ते अगदी स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय राहायचे. त्यावेळी दादा हे पायी श्री रामानंद तीर्थ यांच्या सोबत चालत कन्याकुमारी गाठले होते त्यावेळी त्यांच्यासोबत देवीसिंग चव्हाण सह इतर सहकारीही सोबत होते,धाराशिव आणि सोलापूर या दोन जिल्ह्याच्या सीमेवर भूमिगत राहून आपल्या कॅम्पला दारूगोळा पुरवणे, शस्त्रे पुरवणे असे जोखीमीचे कार्य केले दरम्यान त्यांना जुलमी राजवटीने अटक केली आणि त्यावेळी त्यांनी गुलबर्गा (कर्नाटक)येथील तुरुंगावास भोगावे लागले होते.हिप्प्पारगा येथील उभारण्यात आलेले स्तंभ हे दादांनी स्वतः पुढाकार घेत लोकवाट्यातुन उभारणारे ते एक महान लढवय्या स्वतंत्र सैनिक होते.उमरगा तालुक्याचे पहिले आमदार,आणि 1957 ला एम एल सी तुन पुन्हा आमदार असलेले ते एक लोकनेते म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात.पंडित जवाहर लाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यासोबत ते काँग्रेस पक्षात सक्रिय राहिले, दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्षसह काँग्रेस पक्षात अनेक पदे उत्तमरित्या भुषवली.